Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कालव्यांच्या अस्तरीकरणाचा वेग वाढवा अन्यथा आंदोलन

निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले यांचा इशारा

कोपरगाव ः उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे प्रकल्पाच्या अकोले तालुक्यातील कालव्यांच्या अस्तरीकरणाचे काम अत्

आमदार काळेंनी केलेली विकासमकामे जनतेपर्यंत पोहचली पाहिजे – संदीप वर्पे
खिर्डी गणेश येथे शांतता समितीची बैठक उत्साहात
हातगाव येथे शनिवारच्या मध्यरात्री चोरट्यांचा चार तास धुमाकूळ | माझं गाव, माझी बातमी | LokNews24

कोपरगाव ः उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे प्रकल्पाच्या अकोले तालुक्यातील कालव्यांच्या अस्तरीकरणाचे काम अत्यंत मंद गतीने सुरू असून त्यावर तातडीने मशिनरी वाढवून त्या कामास गती देऊन ते काम पावसाळा सुरू होण्याच्या आत संपून टाकावे, अन्यथा कालवा कृती समिती आंदोलन करील असा इशारा निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी एका प्रसिद्धी पत्रकांन्वये नुकताच दिला आहे. सदरचे सविस्तर वृत्त असे की, उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी येत्या 14 जुलै रोजी 54 वर्ष उलटत आली असून हा प्रकल्प 7.93 कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.5 हजार 177.38 कोटींवर गेला असल्याने आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचा इशारा 18 जानेवारी 2023 रोजी अ‍ॅड. अजित काळे यांच्यामार्फत विक्रांत काले व नानासाहेब जवरे यांनी दाखल केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत (क्र.133/2016) दिला होता.त्यानंतर 13 जुलैला आर्थिक अधिकार गोठवले होते.त्यानंतर कालव्यांचे काम जलसंपदा विभागाला डावा कालवा मार्च 2023 अखेर तर उजवा कालवा हा जून 2023 अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले होते.तसे प्रतिज्ञापत्रच केंद्र व राज्य सरकारने उच्च न्यायालयासमोर दिले होते.हा प्रकल्प पूर्ण व्हावा ही राजकीय नेत्यांची अद्याप मानसिकता दिसत नाही. त्यांनी यासाठी विविध क्लुप्त्या लढविण्याचे व स्वतःचे नाक कापून अपशकुन करण्याची एकही संघी ही मंडळी सोडत नाही. त्यांनी प्रकल्प अर्धवट ठेवण्यासाठी नसते उद्योग अद्याप सुरूच ठेवले आहे. त्याचे ताजे उदाहरण हे या भंडारदरा व निळवंडेतून प्रत्येकी 1.5 टी.एम.सी.असे एकूण 03 टी.एम.सी पाणी जायकवाडीत वर्ग करणे गरजेचे असताना पूर्ण साडेतीन टि.एम.सी.पाणी निळवंडेतून वर्ग करून दुष्काळी शेतकर्‍यांवर अन्याय केला असून यांचे ’पुतना मावशी’चे प्रेम उघड झाले आहे.उर्वरित पाणी त्यांनी जाणीवपूर्वक 28 एप्रिल 2024 रोजी प्रवरा नदीत सोडून देऊन आपली सत्तेची पोळी भाजून घेतली आहे. या प्रश्‍नी तातडीने एक बैठक आयोजीत करून जलसंपदा विभागाचे ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाचे धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांना समक्ष भेटून निवेदन देऊन आपल्या मागण्या केल्या असताना अद्याप जलसंपदा विभागाने आपल्या मशिनरी वाढवल्या नाहीत.

शिवाय गेल्या वर्षी निविदा निघून अद्याप एच.आर.व सि.आर.चे काम वर्ष उलटूनही पूर्ण केलेले नाही.अशाच पद्धतीने काम सुरू राहिले तर आणखी पन्नास वर्षे काम पूर्ण होऊ शकणार नाही असा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान आज या प्रश्‍नी दुपारी आढावा घेण्यासाठी कालवा कृती समितीचे जेष्ठ कार्यकर्ते उत्तमराव घोरपडे, सौरभ शेळके, मधुकर घोरपडे,मच्छिन्द्र काळे, उत्तमराव जोंधळे आदींनी कामाच्या ठिकाणी भेट दिली असून त्यातून ही गंभीर बाब उघड झाली आहे. अकोले तालुक्यात कि.मी.3.5 ते 07 या जास्त गळती असलेल्या कालव्यांवर वर्तमानात केवळ तीन ठिकाणी 03 ’पोकलॅन’ व 03 टिप्पर’च्या सहाय्याने अस्तरीकरण करण्याच्या आधीचे मुरुमाचे सपाटीकरण करण्याचे काम मंद गतीने सुरू आहे.त्यामुळे हे काम निर्धारित वेळेत पूर्ण होणे शक्य दिसत नाही.कालवा कृती समितीच्या काही निवडक कार्यकर्त्यांनी नुकतीच आज काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली असून त्या ठिकाणी केवळ वरील 03 ठिकाणी काम सुरू असल्याचे दिसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.म्हाळादेवी गावाच्या पूर्वेस अद्याप काम सुरु झालेले नाही.त्या ठिकाणच्या शेतकर्‍यांची समस्या सुरू केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने दखल घेऊन या ठिकाणी मशिनरी वाढवून त्या कामास गती द्यावी अशी महत्वपुर्ण मागणी अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी शेवटी केली आहे.अन्यथा कालवा कृती समिती जलसंपदा विभागाच्या विरुद्ध आंदोलन करील असा इशारा दिला आहे.त्यासाठी अधीक्षक अभियंता यांनी संगमनेर या ठिकाणी तातडीने अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक बोलवावी अशी मागणी काले यांनी केली आहे.

मशिनरी वाढवून कामास गती देणार ः कार्यकारी अभियंता हापसे – दरम्यान या प्रश्‍नी आमच्या प्रतिनिधीने निळवंडे धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी, तीन कि.मी.मुरूम सपाटीकरणाचे काम संपत आले असून आगामी काळात आणखी एका ठिकाणी मशिनरी वाढवून कामास गती देण्यात येणार असून आगामी 25 मे पर्यंत ते पूर्ण केले जाईल अशी ग्वाही दिली आहे.

COMMENTS