दिव्यांग आणि महिला मतदार नोंदणीची विशेष मोहीम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांग आणि महिला मतदार नोंदणीची विशेष मोहीम

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे जिल्ह्यात सर्वत्र दिव्यांग आणि महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याची माहि

बाळ बोठेचा मोबाईल क्रमांक अ‍ॅक्टीव्ह होण्यामागं नेमकं गौडबंगाल काय ? l Bal Bothe l Rekha jare*
LOK News 24 दखल; अहमदनगर महापालिकेच्या अमृत योजनेचे पैसे थकले l LokNews24
पर्यटन विकास आराखड्यात कोपरगावला प्राधान्य द्या

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे जिल्ह्यात सर्वत्र दिव्यांग आणि महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिन होणार असून, त्याच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकार्‍यांच्यावतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी पाटील यांनी माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुध्दा मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी. तसेच येणार्‍या राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी तालुका आणि गाव पातळीवर राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन विविध संस्था संघटनांनी करावे, असे आवाहन केले आहे.

35 लाखावर मतदार
उपजिल्हाधिकारी निवडणूक पाटील म्हणाले, नुकत्याच अद्ययावत मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या असून यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात एकूण 35 लाख 57 हजार 266 मतदार असून यामध्ये 18 लाख 50 हजार 954 पुरुष मतदार तर 17 लाख 6 हजार 127 स्त्री मतदार आणि 185 तृतीयपंथी मतदार आहेत. नव्याने मतदार नोंदणीसाठी, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनातर्फे मतदार जनजागृती काम सुरु आहे. येत्या 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. त्यानिमित्त 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय मतदार दिवस गेल्या 12 वर्षापासून राज्यात साजरा होत आहे.

यंदा साजरा करण्यात येणार्‍या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे शासनाचे निर्देश असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मतदारांच्या नोंदणीचे प्रमाण वाढावे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून सध्या 1000 पुरूष मतदारांमागे स्त्रियांचे प्रमाण हे 922 इतके आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येत्या काळात ऑनलाईन मतदार नोंदणीवर जास्त भर दिला जाणार आहे. मतदार यादी निर्दोष व त्रुटीविरहीत करण्यासाठीचे काम निवडणूक कार्यालयातर्फे करण्यात येत असून मृत झालेले व स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

COMMENTS