Homeताज्या बातम्यासंपादकीय

महायुतीमध्ये जागावाटपावरून ठिणगी

महाराष्ट्रातील महायुतीमध्ये सध्या अनेक मित्रपक्ष सहभागी होतांना दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजपसोबतच शिंदेंची शिवसेना, त्यानंतर अजित पवारांची रा

रथयात्रा, पदयात्रांचे पेव
निर्भयाची पुनरावृत्ती
आश्‍वासनांची खैरात

महाराष्ट्रातील महायुतीमध्ये सध्या अनेक मित्रपक्ष सहभागी होतांना दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजपसोबतच शिंदेंची शिवसेना, त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँगे्रस डेरेदाखल झाली आहेत. त्यासोबतच काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण देखील दाखल झाले आहेत, मात्र त्यांना राज्याच्या राजकारणात स्थान न देता केंद्रात स्थान देण्याच्या इच्छेनेच त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. शिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद देणार असून, त्यांच्या कन्येला मात्र राज्याच्या राजकारणात स्थान देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अशोक चव्हाण स्थिर-स्थावर झाले असले तरी, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या निमित्ताने महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच सुरू असलेल्या चर्चांवरून शिवसेनेच्या शिंदे गटाला 12 जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. गेल्यावेळी 18 खासदार निवडून आलेल्या शिवसेनेला 12 जागा मिळणार असल्यामुळे शिंदे सेनेचा चांगलाच तिळपापड होतांना दिसून येत आहे. यावरून खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपला सुनावतांना म्हटले आहे की, शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली नाही. त्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडतांना दिसून येत आहे. अजित पवार गटासोबत चार खासदार असल्यामुळे अजित पवार गट 4 जागांवर आपले उमेदवार उभे करून लढण्याची शक्यता आहे. शिवाय आगामी विधानसभेत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची शिंदे आणि अजित पवार गटाची सुप्त इच्छा आहे. तर जागवाटप शेवटच्या क्षणी करण्याचा भाजपचा निर्धार आहे. शिवाय भाजपसोबत अनेक बडे नेते आगामी काळात दिसू शकतात. अशावेळी त्यांच्यासाठी काही जागा राखून ठेवणे भाजपसाठी अत्यावश्यक होणार आहे. त्यामुळे या जागा-वाटप शेवटच्या टप्प्यात फायनल होणार असल्याचे एकंदरित दिसून येत आहे. राज्यातील 48 लोकसभा जागांचे गणित बघितल्यास भाजप किमान 30-32 जागांवर आपले उमेदवा उभे करण्यास इच्छूक आहे. कारण भाजपमध्ये आगामी काही दिवसांमध्ये अनेक बडे नेते प्रवेश करण्यास इच्छूक आहे. अशावेळी त्यांचे पुनर्वसन राज्यात करून आपल्याला प्रतिस्पर्धी नको, अशी देवेंद्र फडणवीस यांची सुप्त इच्छा दिसून येत आहे. त्यामुळे बडे नेते यांना थेट केंद्रामध्येच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा नेत्यांना लोकसभा लढण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भाजपला लोकसभेच्या सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे करण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे शिंदे सेनेसोबत आलेल्या विद्यमान खासदारांना देखील लोकसभा लढण्याची संधी मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागा-वाटपांवरून ठिणगीचे वणव्यात रूपांतर होऊ शकते. अशावेळी भाजप शिंदेसेनेला सोडू शकत नाही. आणि शिंदेसेना भाजपला सोडून इतरत्र जाऊ शकत नाही. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची गरज असल्याची राजकारणावरून अधोरेखित होते. त्यामुळे वादाची ठिणगी जरी पडतांना दिसून येत असली तरी, याचे पडसाद जास्त तीव्र स्वरूपात मात्र उमठणार नसल्याचे दिसून येणार नाही. महायुतीत 32-12-4 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. भाजपाला 32, शिवसेनेच्या शिंदे गटाला 12 आणि अजित पवार गटाला 4 जागा दिल्या जाणार असल्याचा कथित फॉर्म्युला सध्या समाजमाध्यमांवरही व्हायरल होत आहे. त्यावर शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. महायुतीमधील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कुठून आला मला माहिती नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही.  गेल्या निवडणुकीत भाजपा 26 जागांवर लढली होती. त्यांचे तीन उमेदवार पराभूत झाले आणि त्यांनी 23 जागा जिंकल्या. तर आम्हाला 22 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी आमचे चार उमेदवार पडले आणि आम्ही 18 जागा जिंकल्या. तसेच राज्यात विरोधी पक्षांचे सात उमेदवार जिंकले. असेही कीर्तिकर यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे जागा-वाटपांवरून महायुतीमध्ये किती आलबेल असेल, यावर पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

COMMENTS