Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबट गोड चिंचामुळे अनेकांना मिळाला रोजगार

दरवाढ कमी जास्त झाल्याने भाव मिळतो कमी

राहाता ः शेतकर्‍यांच्या शेतात व घराच्या अंगणामध्ये चिंचांचे झाड असते सध्या उन्हाळ्याचे दिवस असून या चिंचाच्या झाडांना आंबट गोड चिंचा लागलेल्या पा

सिंगल फेजने विद्युत पुरवठा मिळावा यासाठी कोरडगाव ग्रामपंचायत आणि वंचितच्या वतीने महावितरणला निवेदन
विवाहितेचा छळ करून खून, नातेवाईकांचा ठिय्या | LOKNews24
युवकांनी जिम साहित्याचा फायदा घेवून शरीर सुदृढ बनवावे 

राहाता ः शेतकर्‍यांच्या शेतात व घराच्या अंगणामध्ये चिंचांचे झाड असते सध्या उन्हाळ्याचे दिवस असून या चिंचाच्या झाडांना आंबट गोड चिंचा लागलेल्या पाहण्यास मिळत आहे. या चिंचा खाण्याजोगे झाल्यास ते झाडावरून उतरविले जातात. शहरातील संदीप गाडेकर यांच्या शेतातील तीन ते चार झाडांची चिंचा उतरवण्याचे काम चालू असून या चिचा काढण्याचे काम तालुक्यातील राजणगाव येथील हारुण भाई शेख यांना देण्यात आले आहे.
शेख यांच्यामार्फत दहा जणांच्या टोळीच्या माध्यमातून झाडावरून चींचा उतरवनाचे काम केले जात आहे.यावेळी शेख यांनी सांगितले की माझ्याकडे जवळपास 60 माणसांची टोळी असून राहाता परिसरात व श्रीरामपूर परिसरात चिचा उतरवण्याचे काम चालत आहे. याचबरोबर आंबे काढणे,सोयाबीन ची कामे याच मजुरा मार्फत केले जाते. या चिंचाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब मजुरांच्या हातांना रोजगार मिळत आहे. गेल्या 30 ते 25 वर्षापासून मी हे काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या चिंचा काढल्यानंतर चिंचांना जोडपून त्याची साल पडण्यात येते त्यामधून चिचुके काढण्यात येते.यानंतर चिंच वाळवून ती व्यापार्‍याकडे विक्रीस नेली जाते या धंद्यामध्ये कधी नफा तर कधी तोटा होत असल्याची खंत शेतकरी व व्यापारी यानी व्यक्त केली.

COMMENTS