Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिया खान आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

मुंबई प्रतिनिधी - 3 जून 2013 रोजी जिया खानच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. अभिनेत्रीच्या आईने तिचा प्रियकर सूरज पांचोली याच्याव

अल्पवयीन मुलाने एक वर्षाच्या निष्पाप मुलीची केली हत्या | LOKNews24
राजन साळवी यांच्या कुटुंबाची 20 मार्चला एसीबी करणार चौकशी
तरडगांव येथील जयश्री अडसूळ बेपत्ता

मुंबई प्रतिनिधी – 3 जून 2013 रोजी जिया खानच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. अभिनेत्रीच्या आईने तिचा प्रियकर सूरज पांचोली याच्यावर हत्येचा आरोप केला होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सुरज पांचोलीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणात सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एएस सय्यद म्हणाले, पुराव्याअभावी हे न्यायालय सूरज पांचोलीला दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने आज प्रियकर सूरज पांचोलीच्या विरोधात निकाल दिला आहे. सुरज पांचोलीची सुसाईड नोटमध्ये लावण्यात आलेल्या सर्व आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातूनही अभिनेत्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

COMMENTS