सोनई पोलिसांनी गोवंशीय जनावराचा टेम्पो पकडला

Homeताज्या बातम्याअहमदनगर

सोनई पोलिसांनी गोवंशीय जनावराचा टेम्पो पकडला

अहिल्यानगर / वार्ताहरनेवासा तालुक्यातील लोहगाव येथील वांजोळी चौक येथे गोवंशीय जातीची जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून

संगमनेरमध्ये बस व मोटर सायकलचा अपघात
तनपुरे कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशी करा
पिंपळनेर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंतांचा सम्मान

अहिल्यानगर / वार्ताहर
नेवासा तालुक्यातील लोहगाव येथील वांजोळी चौक येथे गोवंशीय जातीची जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार दि 9रोजी टेम्पो क्रमांक एम.एच-16 सीडी 4078 टेम्पोमध्ये गीर जातीची शिंगे नसलेली दहा हजार रुपये किमतीची एक गाय व काळया पांढऱ्या रंगाची जर्सी गाय वरील किमतीची गोवंशीय जनावरे यांना आखूड दोरखंडाने निर्दयीपणाने बांधुन यांच्या चारा पाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना टेम्पो मधून त्यांची वाहतूक करताना मिळून आले.

पोलीस कॉन्स्टेबल पोपट गणेश गावडे यांच्या फिर्यादीवरून सोनी पोलीस ठाण्यात अंकुश महादेव गीते वय 35 वर्ष राहणार मोरे चिंचोरे, बाळासाहेब पठारे राहणार वांबोरी तालुका राहुरी, अविनाश बऱ्हाटे राहणार घोडेगाव यांच्याविरुद्ध गु र न 259/2025 महा पशुसंवर्धन अधिनियम 1976 चे कलम 5अ/5ब चे उल्लंघन 9 सह प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम 11 सह भारतीय न्याय संहिता3/5 मोटार वाहन अधिनियम192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब राख हे करीत आहे.

सोनई परिसरामध्येगोवशीय जनावरे खरेदी करण्याच्या टोळ्या तयार झाल्या असून यावर पोलीस प्रशासनाकडून वारंवार कारवाई करून सुद्धा हे धंदे थांबत का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे चोरून या जनावरांची वाहतूक सुरूच आहे गेल्या काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने चांदा परिसरामध्ये मोठी कारवाई करून गोवंशीय जनावरांची सुटका केली होती तरीही धंदे थांबायचे नाव घेईना त्यामुळे यातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

COMMENTS