Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावयाने केली पत्नी आणि सासूची हत्या

राहुरी तालुक्यातील कात्रडमध्ये धोंड्याच्या महिन्याचा असाही शेवट

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः धोंड्याचा महिन्याचा शेवट सुरू असतांना, राहुरी तालुक्यातील कात्रड येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या के

राजकीय वैमनस्यातून नराधमांनी आख्ख्या कुटुंबाला संपवलं  
यवतमाळमध्ये दोघांची निर्घृण हत्या
आई वडिलांनी मुलीला फेकून दिले नाल्यात

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः धोंड्याचा महिन्याचा शेवट सुरू असतांना, राहुरी तालुक्यातील कात्रड येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पत्नी नूतन सागर साबळे (वय 23 वर्षे) तर सासु सुरेखा दिलीप दांगट (वय 45 वर्षे) अशी मयतांची नावे आहेत. कात्रड गावामधे 15 आँगस्ट रोजी रात्री साडेआकरा वाजण्याच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली.पत्नी व सासुच्या खुना नंतर आरोपी सागर साबळे याने नगर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती राहुरी पोलिसांच्या तपास पथका समोर आली आहे.
               याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील काञड येथिल सागर सुरेश साबळे हा घरजावई म्हणून राहत होता त्याने आपल्या राहत्या (सासुरवाडीतील) घरात पत्नी आणि सासू झोपेत असतानाच डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून ही हत्या केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. खुनाच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.त्याचा शोध घेत असताना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नुतन यांची मुलगी मामाकडे झोपण्यास गेली होती. मामाने बहिणीकडे मुलीस सोडण्यासाठी आला असता त्यास ही धक्कादायक घटना निदर्शनास आली. दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यानंतर घटनेची माहिती भावाने राहुरी पोलिसांना दिली. घटनास्थळी श्‍वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले.परंतू कोणताही माग निघाला नाही. मात्र घटनेनंतर दुपारी आरोपी सागर साबळे (रा.कात्रड) याने नगर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती राहुरी पोलिसांना समजली आहे. धोंड्याच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी जावयाने सासू, पत्नी निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. राहुरी तालुक्यातील कात्रड येथे कौटुंबीक वादातून जावयाने पत्नी व सासूचा काटा काढला आहे. संपूर्ण कात्रड गाव झोपेत असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जावयाने हे क्रूरकर्म केल्याचे पुढे आले आहे. वांबोरी पाठोपाठ कात्रडमध्ये अवघ्या दोन आठवड्यात दोघांच्या निर्घृण हत्येची घटना समोर आली आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलिस निरीक्षक राजू लोखंडे, पोलिस उप निरीक्षक खोंडे हे तात्काळ पोलिस पथकासह भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत.

ती चिमुकली मात्र निराधार झाली – मामाकडे झोपण्यासाठी गेलेली चिमुकलीने पहाटे आईकडे जाण्याचा हट्ट धरल्याने मामाने त्या चिमुकलीस घेवून बहिणीच्या घरी आला असता समोरचे दृश्य पाहिल्यावर तो हतबल झाला. आणि भाची कवटाळून मोठ्याने आरडाओरड करु लागला. चिमुकल्या मुलीची आई आणि आजी पाठोपाठ बापाचे छत्र गेल्याने ती चिमुकली अखेर निराधार झाली.

COMMENTS