सोमय्यांच्या पत्नीचा राऊतांविरोधात 100 कोटींचा दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमय्यांच्या पत्नीचा राऊतांविरोधात 100 कोटींचा दावा

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेनेविरोधात सातत्याने आक्रमक आणि विरोधी भूमिका घेणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते

करुणा मुंडेंची 31 लाखांची झाली फसवणुक
कोपरगाव-झगडेफाटा रोडवर कंटेनरने रिक्षाला चिरडले ; सात ठार तीन जखमी
मॅरेथॉनमध्ये सलग 11 व्या वर्षी हजारोंच्या संख्येने धावले संगमनेरकर

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेनेविरोधात सातत्याने आक्रमक आणि विरोधी भूमिका घेणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात आज 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे राऊत यांच्यासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी माफी मागण्यास तयार रहावे, असा इशारा देखील सोमय्या यांनी दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात पुढील 2 महिन्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. परंतु या घोटाळ्याबाबत त्यांनी एकही पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे केवळ बदनामी करण्याच्या हेतूने राऊत आपल्यावर आरोप करत असल्याचे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते आहेत. मी 100 कोटींचा दावा दाखल केल्यामुळे त्यांनी आता माफी मागण्याची तयारी सुरु करावी. नेमका कितीचा दंड ठोठावयाचा हे न्यायालय ठरवेल. मात्र, यातून आपण उद्धव ठाकरेंना धडा शिकवणार असल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच, आपल्याला यातील एक पैसाही नको. न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिल्यानंतर आपण सर्व पैसे धर्मादाय संस्थेला देणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. राज्यात उद्धव ठाकरे सरकार माफियागिरी करत आहे. राज्य सरकारविरोधात बोलणार्‍यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. काहीच्या काही आकडे समोर फेकून विनाकारण आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहे. विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या मानहानीच्या दाव्यातून ठाकरे सरकारला आपण धडा शिकवणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

COMMENTS