सोमय्या पुत्राची ’पीएच.डी.’ एक्स्प्रेस सुसाट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमय्या पुत्राची ’पीएच.डी.’ एक्स्प्रेस सुसाट

अवघ्या 14 महिन्यात मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रदान

मुंबई/प्रतिनिधी ः विरोधकांवर टीकेचे आरोप करून त्यांना घायाळ करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबई

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जाहीर
शहरटाकळी येथे अखंड हरिनाम सप्ताहास 23 ला  प्रारंभ  
दोन महिन्यात 916 किलो सोने जप्त

मुंबई/प्रतिनिधी ः विरोधकांवर टीकेचे आरोप करून त्यांना घायाळ करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबई विद्यापीठाने अवघ्या 14 महिन्यात पीएचडीची पदवी प्रदान केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
पीएचडीसाठी संशोधन करतांना अनेकांची वाट लागते. संदर्भ साहित्य शोधणे, अनेकांच्या मुलाखती घेणे, तथ्य शोधणे, निष्कर्ष काढणे यामध्ये बराचसा कालावधी जातो. अनेकांना किमान तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी पीएचडीसाठी लागतो. मात्र अतिबुद्धीमान मात्र काही महिन्यातच आपला प्रबंध पूर्ण करतात. मात्र त्यांची संख्या विरळच. नील सोमय्या यांनी 14 महिन्यात प्रबंध पूर्ण केला याचाच अर्थ नील सोमय्या एकतर अतिबुद्धीमान असावे, किंवा त्यांचे संशोधनात त्रुटी असाव्यात असे दिसून येते. त्यामुळे सोशल मीडियावर नील सोमय्या चांगलेच ट्रोल होतांना दिसून येत आहे. नील सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठात पीएचडी पदवीसाठी जून 2021 मध्ये नोंदणी केली. त्यांनी ऑगस्ट महिन्यात पीएचडीसाठी शोध प्रबंध विद्यापीठाला सादर केला. त्यानंतर लगेच दीड महिन्यात त्यांची तोंडी परीक्षा झाली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी 1 ऑक्टोबर 2022 रोजी विद्यापीठाने नील सोमय्या यांना पीएचडी पदवी दिली. नील सोमय्या यांचे पीएचडीचे मार्गदर्शक एम. ए. खान होते. ते म्हणतात की, नील यांनी पीएचडी पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केल्याची बाब एकतर विद्यापीठाने नमूद केली नाही. त्यांनी मार्च 2020 मध्ये प्रबंध सबमिट केला. त्यात कोरोना लाट आली. त्यांना 2021 मध्ये काही सुधारणा सांगितल्या. त्यांनी त्या करून लगेच वर्षात प्रबंध सादर केला. त्यांनी सर्व प्रक्रियांचे पालन केले. फक्त विद्यापीठाने त्यांच्याबाबत खूपच तत्परता दाखवली. मुंबई विद्यापीठाचे प्रवक्ते म्हणतात की, नील सोमय्या यांना नियमानुसारच पीएचडी पदवी दिली आहे. त्यांनी जून 2021 मध्ये नोंदणी केली. ऑगस्ट 2022 मध्ये प्रबंध दिला. नोंदणीनंतर 12 महिन्यात विद्यार्थी प्रबंध सादर करू शकतो. इथे 14 महिने लागले. त्यामुळे सर्व काही नियमानुसार आहे.’आयएनएस विक्रांत’प्रकरणीही किरीट सोमय्यांसह नील सोमय्या यांचे नाव चर्चेत आले होते. ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली 57 कोटी रुपयांचा फंड जमा करून घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्यावर झाला होता. एका माजी लष्करी व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर 6 एप्रिल रोजी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरुद्ध मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतसाठी मुंबईत निधी गोळा केला होता. हा निधी राजभवानाकडे सुपूर्द करणे गरजेचे होते. पण, सोमय्यांनी निधी राजभवनाला दिला नाही, असे म्हटले होते.

COMMENTS