Homeताज्या बातम्यादेश

हेलिकॉप्टर कोसळून जवान शहीद

दोन पायलट गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह तालुक्यातील मछना गावाजवळ सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून एक जवान शहीद झाला असून, इतर दोन पायलट

सोलापूर रेल्वे विभागात राजभाषा हिंदी कार्यान्वयन समितीची बैठक उत्साहात
सिद्धार्थ-मिताली आईबाबा होणार
चांदवड शहरात अग्निशमन गाडी दाखल…भूषण कासलीवाल यांच्या प्रयत्नांना यश… 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह तालुक्यातील मछना गावाजवळ सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून एक जवान शहीद झाला असून, इतर दोन पायलट गंभीर जखमी झाले आहे.
लष्कराच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघातात पायलट जखमी झाले असून त्यांना ि दुखापत झाली आहे. यासंदर्भात सैन्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या किश्तवारजवळ सैन्याचे एएलएच-ध्रुव  हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या घटनेत एक जवान शहीद झाला असून, दोन जवान जखमी झाले आहेत. तसेच पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सैन्याचे हेलिकॉप्टर कसे कोसळले ? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पाऊसही पडत आहे. त्यामुळे हा अपघात खराब हवामानामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

COMMENTS