सोलापूर जिल्हातील पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील एका नागरिकांने ३ मे रोजी शेतजमीन खरेदी केली होती.या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर नोंद लावल्याबद्दल बक्ष
सोलापूर जिल्हातील पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील एका नागरिकांने ३ मे रोजी शेतजमीन खरेदी केली होती.
या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर नोंद लावल्याबद्दल बक्षीस म्हणून व याच जमिनीवरील बँकेचा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी झिरो कर्मचारी ज्ञानेश्वर साळुंखे यांनी 1 हजार रुपयांची मागणी करीत शेळवे गावातील बसस्टॉपजवळ लाच
घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रंगेहाथ पकडल्याने पंढरपूरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित तलाठी व मदतनीस ज्ञानेश्वर साळुंखे यांची चौकशी केली.यानंतर ज्ञानेश्वर साळुंखे याच्या विरोधात फिर्याद दिल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.याचा अधिक तपास पोलिस करित आहेत.
COMMENTS