Solapur: शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओ स्वामी यांनी घेतला क्लास…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur: शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओ स्वामी यांनी घेतला क्लास…

प्रतिनिधी सोलापूर तब्बल अठरा महिन्यानंतर सोमवारी शाळेची घंटा वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप

मंगळवेढयात 10 लाखाचा गुटखा पोलिसांनी केला जप्त l LokNews24
Solapur : बेगमपूर जवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात (Video)
Solapur : मंद्रुप महावितरणचा भोंगळ कारभार (Video)

प्रतिनिधी सोलापूर

तब्बल अठरा महिन्यानंतर सोमवारी शाळेची घंटा वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एस.व्ही.सी.एस हायस्कूल येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
त्यांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. स्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.

याप्रसंगी  माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, गटविकास अधिकारी राहुल देसाई, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, शाळेचे मुख्याध्यापक कौलगी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी दिलीप स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तसेच  शाळेच्या आवारात दिलीप स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी वर्गात कोविडविषयक घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होटगी व उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी शाळेला स्वामी यांनी भेटी देऊन आढावा घेतला.

COMMENTS