Solapur : वीज पुरवठा आठ तास न केल्याने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : वीज पुरवठा आठ तास न केल्याने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे (Video)

करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरण कार्यालयास संतप्त शेतकऱ्यांनी  टाळे ठोकत संताप व्यक्त केला आहे . ए पी ग्रुप संस्थापक अध्यक्ष अच्युत पाटील  य

कोळशाअभावी राज्यात वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद… देशभरात भारनियमन सुरु होण्याची शक्यता
वीजबिल भरायचं आहे… महावितरणने आणला नवा नियम… रोखीने बिल भरण्यासाठी पाच हजारांची मर्यादा
सुरक्षित दिवाळी साजरी करा… महावितरणचे आवाहन

करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरण कार्यालयास संतप्त शेतकऱ्यांनी  टाळे ठोकत संताप व्यक्त केला आहे .


ए पी ग्रुप संस्थापक अध्यक्ष अच्युत पाटील  यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालय केमला संतप्त शेतकरयांनी टाळे ठोकले.  शेतीपंपाचा वीजपुरवठा अचानक दोन तास केला होता …

दोन दिवसात हा वीजपुरवठा आठ तास करा अन्यथा महावितरण कार्यालय केम ला टाळे ठोकणार असा इशारा दिला होता .कोरोना काळात आवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता शेतकरी विविध कारणांनी संकटात आलेला असल्याने  वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही.

अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच 100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही.  जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आठ तासावरून दोन तास वीज देऊन जखमेवर मीठ चोळले जात आहे .अशी भावना केम येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

COMMENTS