thumbnail - Solapur : मंद्रूप ग्रामसेवकांचा गलथान कारभार slug- नागरिकांची होतेय मोठी हेळसांड ग्रामसेवक वेळेत येत नसल्
thumbnail – Solapur : मंद्रूप ग्रामसेवकांचा गलथान कारभार slug- नागरिकांची होतेय मोठी हेळसांड
ग्रामसेवक वेळेत येत नसल्याने काम खोळंबले
ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. मंद्रूप ग्रामसेवक हे कामावर उपस्थित राहत नाहीत. त्यांची कामावर येण्याची व जाण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे ग्रामस्थांची कार्यालयीन कामे अपूर्ण आहेत. शिवाय सरपंच यांची देखील कार्यालयात येण्याची जाण्याची वेळ ठरलेली नाही.
गावातील नागरिक महत्वाची कामे घेऊन जेव्हा ग्रामपंचायत कार्यालयात येतात तेव्हा ग्रामसेवक उपस्थित नसल्याने नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे, अशी तक्रार नागरिक करत आहेत . त्यामुळे गावात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गावात स्वच्छता नसून, रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
गावातील अनेक रोड खड्डेमय झालेले आहेत, अशा अनेक तक्रारीसाठी आणि विविध योजनांच्या माहिती घेण्यासाठी नागरिक कार्यालयात येत असताना ग्रामसवेक हजार नसल्याने मोठा खोळंबा होत आहे.
COMMENTS