Solapur : बेगमपूर जवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : बेगमपूर जवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात (Video)

सोलापूर - मंगळवेढा महामार्गावरील दुभाजकावरून भरधाव वेगाने व चुकीच्या बाजूने निघालेल्या ट्रकने  कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण जा

Solapur : लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद
Madha : बाजारपेठेत येण्यासाठी मोडनिंब-करकंब मुख्य मार्ग (Video)
Karamala : बलात्काऱ्याला फाशीच्या शिक्षेची केली मागणी (Video)

सोलापूर – मंगळवेढा महामार्गावरील दुभाजकावरून भरधाव वेगाने व चुकीच्या बाजूने निघालेल्या ट्रकने  कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बेगमपूर गावाजवळील स्टेट बँकेसमोर सोमवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. यात सुनील बनसिद्ध वाघमारे वय ३१ रा.टिळकनगर, मजरेवाडी हा युवक जागीच ठार झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस व गावातील ग्रामसुरक्षा दलातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकून पडलेल्या दोघांना बाहेर काढून तात्काळ सोलापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले तर एकाला कारचा दरवाजा गॅस कटरने कापून बाहेर काढले. परंतु दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

या अपघातानंतर ट्रक चालकाने तात्काळ पलायन केले. सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू दुधे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS