उद्यापासून सुरु होत असलेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त मंद्रूप पोलीस ठाण्यात पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. बैठकीस मंद्रूप
उद्यापासून सुरु होत असलेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त मंद्रूप पोलीस ठाण्यात पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. बैठकीस मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील, नवरात्र महोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांना निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने कोविड 19 च्या प्रादुर्भावाला अनुसरुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासंबंधी मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ.नितिन थेटे आणि पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी मार्गदर्शन केले. कोविड 19 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ.नितिन थेटे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले.
COMMENTS