Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ विचारांची समाजाला गरज-डॉ.मिलिंद आवाड

तलवाडा प्रतिनिधी - कर्मवीर एकनाथ आवाड स्मृतिदिन व मानवी हक्क कार्यकर्ता सन्मान पुरस्कार कार्यक्रमांमध्ये जनसमुदायाला संबोधित करताना मानवी हक्क अभ

किरीट सोमय्यांचा दावा… उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मंत्र्यांच्या बांधकामावर पडणार हातोडा…
अखेर मुंबईमध्ये पावसाला सुरूवात
कासट,मानधने चांडक यांची जिल्हा माहेश्वरी सभेवर वर्णी

तलवाडा प्रतिनिधी – कर्मवीर एकनाथ आवाड स्मृतिदिन व मानवी हक्क कार्यकर्ता सन्मान पुरस्कार कार्यक्रमांमध्ये जनसमुदायाला संबोधित करताना मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष तथा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर प्रा.डॉ. मिलिंद आवाड साहेब म्हणाले आजच्या काळामध्ये अजून आपल्याला शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचाराची गरज आहे आणि  सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्याची गरज आहे पुढे बोलताना म्हणाले कर्मवीर एकनाथ आवाड (जिजांनी) एक लाख हेक्टर जमीन गायरान धारकांना मिळून दिली हे सर्वात मोठे आपले यश आहे असे आपल्या भाषणामध्ये संबोधित करताना म्हणाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक अशोक धिवरे यांनी एकनाथ आव्हाड यांच्या सहवासातील मुद्द्यांना उजाळा दिला तर लोकशाही चैनल चे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घडामोडीवर आणि त्यांच्या जीवनातील चढउतार या मुद्द्यावर भाषण केले. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या विषयाला धरून मग दलित अन्याय अत्याचार असेल मजुरांचे अधिकार असतील अठरापगड जातीला न्याय मिळवून देण्याचे काम मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात संघटना काम करीत आहे अशा कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून मानवी हक्क कार्यकर्ता सन्मान पुरस्कार वितरण करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद एकनाथ आवाड साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक अशोक धिवरे आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शक कमलेश सुतार यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये तब्बल 80 जणांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मंचावर उपस्थित मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद आवाड, माजी सीआयडी प्रमुख पुणे अशोक धिवरे, लोकशाही चैनल चे मुख्य संपादक कमलेश सुतार, माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके, वेगवेगळ्या संघटनेचे, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आणि मानवी हक्क अभियानचे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व  पदाधिकारी उपस्थित

COMMENTS