Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाज नेहमीच चांगल्या कार्याची दखल घेत असतो ः अ‍ॅड. मडके

शहरटाकळी/ प्रतिनिधी ः समाज नेहमीच चांगल्या कार्याची दखल घेत असतो. ग्रामस्थांनी केलेला सन्मान म्हणजे कौतुकाची थाप असून,आपल्या कार्याचा जनमानसामध्य

अहमदनगर : एमआयडीसीत गुंड लोकांचा त्रास… शिवसेनेची उद्योगमंत्र्यांकडे तक्रार…
संगमनेरच्या डॉ. खेडलेकरांनी ही सोडले साहित्य-संस्कृती सदस्यत्व
अहमदनगरमधील 87 हजारजणांना द्यायचाय दुसरा डोस

शहरटाकळी/ प्रतिनिधी ः समाज नेहमीच चांगल्या कार्याची दखल घेत असतो. ग्रामस्थांनी केलेला सन्मान म्हणजे कौतुकाची थाप असून,आपल्या कार्याचा जनमानसामध्ये चांगल्या पधदतीचा ठसा उमटवला असून ,ग्रामस्थांच्या व मातृभूमीच्या सन्मानातून पुढील काळात तुम्हाला काम करण्याची  प्रेरणा मिळो, असे वक्तव्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती अ‍ॅड.अनिल मडके यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी  गावचे सुपुत्र ग्रामविकास अधिकारी प्रशांत माधवराव बरबडे यांची शेवगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच  पॅरामेडिकल फोर्समध्ये हरी कालिदास चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल  हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, भजनी मंडळ व  ग्रामस्थांच्या वतीने येथील हनुमान मंदिर सभागृहात त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी  अ‍ॅड.मडके बोलत होते.   प्रमुख मान्यवर म्हणून व्हॉइस चेअरमन संतोष शेटे, राजेंद्र काकडे, रामचंद्र गिरम,राजेंद्र गांधी, सुभाष बरबडे,मेजर रमेश नरवडे, पत्रकार रविंद्र मडके, शेषराव आपशेटे,शेखर जोशी, ताराचंद शिंदे, भजनी मंडळाचे  हभप  शिवाजीराव  मडके, ह भ प गणेश गवळी,ह भ प श्रीराम खेडकर,ह.भ.प अरुण इथापे, ह.भ.प मोहनराव खंडागळे , ह.भ.प गोविंदराव कावळे, देविदास दगडे ,नामदेव गादे, छोटू दूधमल, बोरुडे  उपस्थित होते.यावेळी  ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत बरबडे यांनी सत्काराला उत्तर देताना समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली, प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार रविंद्र मडके यांनी केले. तर रामचंद्र गिरम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

COMMENTS