Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवाह संस्थेच्या माध्यमातून रेशीम गाठी बांधणारे सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे

कडा। प्रतिनिधीमुळगाव जामखेड तालुक्यातील हळगांव परंतु सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने श्रीगोंदा येथे स्थायिक होऊन विवाह जुळविण्याचे का

महाबळेश्‍वरमध्ये मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट
बँकांनी शेतकरी पीक कर्ज वाटपासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे : भुजबळ
शेअर मार्केटिंग साठी तालुक्यात एजंटाचा सुळसुळाट : वर्षात डबल करून देणारे आज गायब

कडा। प्रतिनिधी
मुळगाव जामखेड तालुक्यातील हळगांव परंतु सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने श्रीगोंदा येथे स्थायिक होऊन विवाह जुळविण्याचे काम करणारे सुभाष ढवळे यांनी आतापर्यंत पर्यंत दिड हजारांवर विवाह जुळवून दिले आहेत. विवाह इच्छुकांच्या रेशीम गाठी बांधणारे सुभाष ढवळे यांना या सामाजिक कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते अनेक पुरस्कारही मिळाले आहेत तसेच ठिकठिकाणी सत्कारीत करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मुलांचे विवाह जुळणे अवघड होऊन बसले आहे. आज प्रत्येक गावात विवाह इच्छुक तरुणांची संख्या प्रचंड आहे. परंतु श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांनी विवाह मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत दिड हजारांवर विवाह जुळवून दिले आहेत. त्यांच्या या महत्त्वाच्या सामाजिक कार्याबद्दल आतापर्यंत अनेक सामाजिक कार्याचे पुरस्कार मिळाले आहेत.
श्रीगोंदा येथील व गोरगरिबांसाठी झटणारा खरा सामाजिक कार्यकर्ता सुभाष ढवळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत सर्वधर्मीय मुला-मुलींचे 1600 शुभविवाह जमविले आहेत.  दोन्हीही घरांचे मिलन माणुसकी जपण्याचे काम ढवळे वधु वर सूचक मंडळाच्या माध्यमातून ते करतात. श्री सुभाष ढवळे यांना प्रहार दिव्यांग संघटना अहिल्यानगर आणि जय मल्हार फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य यशवंत सेना सरसेनापतीचे संस्थापक अध्यक्ष  माधव गडदे, अहिल्यानगर यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष श्री विजय तमनर, आमदार  संग्रामभैय्या जगताप यांचे बंधू श्री सचिनभैय्या जगताप, खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन जिल्हाप्रमुख श्री राजेंद्र पोकळे या सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते श्री सुभाष ढवळे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला.  श्री सुभाष ढवळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल  त्यांचे विधान परिषदेचे सभापती ना. राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अहिल्यानगर शहराचे आमदार  संग्रामभैय्या जगताप,  श्रीगोंदाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते, सांगली पंचायत समितीच्या माजी सदस्या अनिताताई कदम तसेच रयत शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष संजय लाड, जामखेड तालुक्यातील हळगावचे  मा. उपसरपंच आबासाहेब ढवळे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेकांनी सुभाष ढवळे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत विधानपरिषदेचे सभापती प्रा. ना. राम शिंदे यांनी  एका लग्न सोहळ्यानिमित्त सुभाष ढवळे यांची भेट घेऊन  विविध विषयावर चर्चा केली तसेच सुभाष ढवळे यांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रा.ना. राम शिंदे यांनी तोंड भरून कौतुक केले. ढवळे वधू वर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुभाष ढवळे यांच्या हस्ते मा. सभापती राम शिंदे यांचा विशेष सन्मान सत्कार करण्यात आला.

COMMENTS