Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षणातून सामाजिक जाणीव निर्माण झाली पाहिजे-डॉ.हनुमंत सौदागर

केज प्रतिनिधी - शिक्षणातून सामाजिक जाणीव निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकता रुजली पाहिजे असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते शहरा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना प्रदान
पासपोर्ट सेवा देशभरात 5 दिवस राहणार बंद
किरीट सोमय्यांचा दावा… उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मंत्र्यांच्या बांधकामावर पडणार हातोडा…

केज प्रतिनिधी – शिक्षणातून सामाजिक जाणीव निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकता रुजली पाहिजे असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते शहरातील जीवन विकास शिक्षण मंडळ संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयात वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष फजिलोद्दीन काझी,प्रमुख  उपस्थिती शैलाताई इंगळे, प्रमुख पाहुणे पत्रकार डॉ हनुमंत सौदागर,मुख्याध्यापक वसंत शितोळे , सहशिक्षक गणेश भालेकर,अमोल कापसे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विशेष गुण असतोच फक्त तो शोधून त्याला दिशा देण्याची भूमिका शिक्षक करत असतात. शिक्षण हे पैसा कमावण्याचे साधन न होता माणूस म्हणून जगण्याचे साधन व्हावे असे मत व्यक्त केले. इंगळे म्हणाल्या विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुणांचा विकास होण्यासाठी शिक्षक पालक दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री चौरे ,श्री सूर्यवंशी ,श्री चोले,श्री शेप, श्री मंगरूळकर श्रीमती देशमुख ,श्रीमती कुलकर्णी ,श्रीमती लोखंडे, श्रीमती देशपांडे आदींनी परिश्रम घेतले

COMMENTS