Homeताज्या बातम्यासंपादकीय

..,तर, उदयन भोसले यांची वाटचाल सांस्कृतिक गुलामीकडे..!

   महाराष्ट्र ही फुले-शाहू-आंबेडकर विचारांची भूमी आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा महाराष्ट्रात वैचारिक भूमिकेचा दबदबा असणारी आहे. यावर कदा

कंत्राटी भरती आणि आरोप-प्रत्यारोप! 
राजकीय कोंडी फोडण्याची इतिहास दत्त जबाबदारी ओबीसींचीच!
उध्दव ठाकरेंचे एकला चलो रे, का ?

   महाराष्ट्र ही फुले-शाहू-आंबेडकर विचारांची भूमी आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा महाराष्ट्रात वैचारिक भूमिकेचा दबदबा असणारी आहे. यावर कदाचित सत्ताकारणाचा राजकीय विचार-प्रवाह नसेलही; परंतु, सामाजिक पातळीवर याच विचारांचा दबाव आणि प्रभाव राहिला आहे. महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हाती आज आहे, त्या भाजपच्या तथा महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे; यावरून महात्मा फुले यांचे महाराष्ट्रातच नव्हे, तर, देशाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, हे लक्षात येते. परंतु, महाराष्ट्राचे एक मराठा नेते असणारे उदयन भोसले यांनी काल महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात वक्तव्य करताना, स्त्रीयांसाठी पहिली शाळा पहिले प्रतापसिंह राजे यांनी काढल्याचे अनाठायी वक्तव्य केले. वास्तविक, महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उदयन भोसले यांनी केलेले वक्तव्य हे पक्षपाती दृष्टीकोन ठेवणारे आहे. स्त्रीयांसाठी पहिली शाळा पहिले प्रतापसिंह राजे यांनी काढली असेल तर, आम्ही त्यांचे स्वागतच करणार. कारण शोषणाच्या दमण व्यवस्थेत खितपत पडलेल्या स्त्रियांना मुक्तीच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणजे शिक्षणाचा प्रारंभ, असाच आम्ही विचार करतो. परंतु, उदयन भोसले यांनी इतिहासात संशोधन करून असं वक्तव्य केले आहे का? असा प्रश्न विचारला तर, त्याचे उत्तर नकारार्थी आहे. त्यांच वक्तव्य हे मराठा – ओबीसी या संघर्षाला इंधन पुरवणं एवढंच आहे. वास्तविक, महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व मराठा समाजानेच केले आहे. जेधे – जवळकर यांनी कधीच अशी वक्तव्य केली नाहीत. मराठा समाज महाराष्ट्रात मध्यंतरी सत्ताधारी जातवर्ग बनण्याचे एकमेव कारण होते ते म्हणजे, सत्यशोधक विचार स्विकारून फुले यांचा व्यवस्था परिवर्तनाचा विचारांची चळवळ व्यापक होण्याआधीच त्यांना राजकीय सत्तेत सामिल करून घेऊन त्यांना सत्तासीन करून व्यवस्था परिवर्तनाचा विचार आणि चळवळ मोडीत काढावी, असा विचार तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेने केला होता. त्याची परिणती मराठा समाज राज्यकर्ता वर्ग बनला हे त्यांनी विसरू नये. परंतु, उदयन भोसले यांनी मात्र, अशा वैचारिक वारसा पासून स्वतःची नाळ तोडून घेणारे वक्तव्य करित आहेत. यामागे, त्यांची एकमेव लालसा दिसते ती एवढीच की, आत्मसन्मान गमावून सत्तेत वावरण्याची! महात्मा फुले हे नाव स्त्रीयांसाठी एखादी शाळा काढली किंवा अस्पृश्यांसाठी शाळा काढली, पाण्याचा हौद सुरू केला एवढ्यापुरती मर्यादित नाही! तर, या देशातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळावं म्हणून संपूर्ण शिक्षण  सार्वजनिक करण्यासाठी, पावणे दोनशे वर्षांपूर्वी ब्रिटीशांच्या हंटर आयोगाला निवैदन दिले होते. त्यातूनच स्वतंत्र भारतातील शिक्षण सर्वांसाठी खुले झाले. उदयन भोसले यांच्या समाज बांधवांनी याच शिक्षणाच्या आता शिक्षण केंद्र उभे करून महाराष्ट्रात बहुजन समाजाचे हक्काचे शिक्षण हिरावून घेत आहेत. कारण, निर्माण झालेले तथाकथित शिक्षण महर्षी त्याच शिक्षणाचा बाजार मांडत आहेत, हे आधी लक्षात घेऊन उदयन भोसले यांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याची वेळ असताना ते महात्मा जोतिबा फुले यांच्या समग्र चळवळीला नाकारण्याच्या पातकाची सुरूवात करू पाहत असतील, तर, त्यांची स्वतःची वाटचाल ते सांस्कृतिक गुलामीचा स्वीकार करण्याकडे येताहेत यात शंका नाही!

COMMENTS