…तर, पवारांवर ही वेळ आली नसती !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

…तर, पवारांवर ही वेळ आली नसती !

 तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं ॥बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं ॥संत तुकारामांच्या श

संगमनेरात अत्याचार करून महिलेचा खून ; अवघ्या ४८ तासात आरोपी गजाआड
यशोमती ठाकूरांची अधिकाऱ्यांनी धमकी
मोदी मित्रांच्या खिश्यात देश घालायला निघालेत

 तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं ॥
बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं ॥
संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तुकोबांबद्दल लिखाण केलं आहे. देहूमध्ये मंबाजी गोसावी,  संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या अनुयायांचा कसा द्वेष करत होते, याविषयी संत बहिणाबाईंनी लिहिलं आहे.
वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।
वेद आणि पंडितांबद्दल संत तुकोराम महाराजांनी हा अभंग रचला आणि वेदांवरील पारंपरिक मक्तेदारीला आव्हान दिलं. पुढे जाऊन वेदाचा अर्थ कळण्याचा अधिकार इतर जातीतील लोकांना, तसंच सर्व स्तरांतील स्त्रियांनाही आहे असं बजावलं.     संत तुकाराम यांच्या संदर्भात डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘विद्रोही तुकाराम’ या ग्रंथातून केलेली मांडणी ही ब्राह्मणेतर संतांच्या विरोधात त्या काळातही ब्राह्मणी धार्मिक परंपरा कशी आक्रमक होती, हे वर्णन केलेले आहे.  विचार तत्कालीन समाजात रुचणारे नव्हते म्हणूनच त्यांचा (तुकाराम महाराजांचा ) छळ होत होता. ‘हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असे संत तुकाराम म्हणतात, याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागली होती असाच होतो, असेही डॉ. आ. ह. साळुंखे लिहीतात.    या सर्व बाबींचा आज संदर्भ देण्याचे कारण असं की, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी एका तथाकथित अभिनेत्रीने गरळ ओकली आहे. शरद पवार यांच्याशी आमचे राजकीय मतभेद असू शकतात; परंतु, सामाजिक पातळीवर शरद पवार यांच्याशी आमचे विचार जुळतात, असे आजही आम्हाला वाटते. ज्या शक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवून त्यांचा राज्याभिषेक नाकारला होता. त्यावेळी धर्माचा पगडा समाजमनावर अधिक असल्यामुळे त्यांनी ही गोष्ट निभावून नेली. परंतु आजच्या काळात आयटीच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा ही प्रभाव समाज मनावर पडत आहे आणि म्हणून भारतीय समाज सांस्कृतिक अंधश्रध्देच्या गर्तेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया ही गतिमान होत आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी जवाहर राठोड या कवींची ‘पाथरवट’ ही कविता वाचून दाखवल्या नंतर संपूर्ण सनातनी शक्ती या उपद्रवशिल झाल्या आहेत! शरद पवार सारख्या देशाच्या राजकारणात जवळपास साडेपाच दशकांचा कालावधी व्यतित केलेल्या व्यक्तीविषयी अत्यंत हिणकस दर्जाची भाषा करणारी तथाकथीत अभिनेत्री ही कोण्यातरी भावे नावाच्या वकिलाची एक कविता शेअर करतेय आणि माध्यम देखील ती पुन्हा – पुन्हा शेअर करतात; याचा अर्थ एकूणच व्यवस्थेत पुन्हा एकदा सनातनी प्रवृत्तींचा पगडा मजबूत होतोय की काय अशी शंका येते.  म्हणूनच शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांविषयी  विखारी आणि विकारी शब्द लिहिण्याचे साहस एखाद्या क्षुल्लक व्यक्तीमध्ये आलेले दिसते. सनातनी शक्तींची सर्वात मोठी ताकद ही लोकांना अंधश्रद्ध बनवण्यातच आहे. त्यामुळे त्या त्या गोष्टीला आव्हान दिले की, मग या शक्ती कशा चवताळून जातात, याचं उदाहरण हे या प्रकरणात दिसते आहे. तरी, हेही नसे थोडके, असे आपल्याला म्हणावे लागेल! कारण आजपर्यंत सनातनी व्यवस्थेवर होणाऱ्या टीकेला उत्तरे देण्यासाठी किंवा त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी बहुदा ब्राह्मणेतर व्यक्तींचा उपयोग केला जात असे! परंतु, आता थेट ब्राह्मण समुदायातूनच अशा प्रकारचे वक्तव्य केले जाते, याचा अर्थ त्यांचा सामाजिक पाठिंबा हा दिवसेंदिवस कमी होतो आहे, याची प्रचीती यातून अनुभवयास येते. अर्थात शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी सामाजिक पातळीवर अशा बाबींच्या कडे फारच दुर्लक्ष केले आहे.  त्यामुळे याचे परिणाम थेट त्यांच्यावर उमटत आहेत. जर शरद पवार यांनी पुण्याच्या खोले बाई यांनी, ‘ शूद्र मराठा स्त्रीमुळे आमचे घर बाटले’, असे जेव्हा थोतांड केले होते, त्याचवेळी पवारांनी सांस्कृतिक किंवा सामाजिक पातळीवर वैचारीक आक्रमण महाराष्ट्रातून निर्माण केले असते तर, कदाचित आज, शरद पवार यांच्यावर देखील ही पाळी आली नसती.

COMMENTS