…तर, देशात निर्माण होऊ शकते दुधाचे संकट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, देशात निर्माण होऊ शकते दुधाचे संकट

लंपी रोगामुळे जवळपास 50 हजार गायींचा मृत्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशातील विशेषतः 9 राज्यांमध्ये लम्पी स्कीन डिसीज म्हणजे एलएसडी या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून, याचा प्रादूर्भाव 9 राज्य

Yeola : येवला नगरपालिकेत विधी विषयक माहिती फलकाचे ऑनलाइन अनावरण (Video)
रेडी रेकनरचे १० ते १५ टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा निराधार : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नगरपालिकेच्या आवारात महापुरुषाचे पुतळे बसवावे ः वहाडणे

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशातील विशेषतः 9 राज्यांमध्ये लम्पी स्कीन डिसीज म्हणजे एलएसडी या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून, याचा प्रादूर्भाव 9 राज्यात दिसून येत आहे. या रोगामुळे देशातील 49 हजार 526 गायींचा बळी गेला आहे. यामुळे देशात दुधाचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ’गायींचे लसीकरण वाढवा, गायी ’वाचवा’ असे मिशन पशू वैद्यकीय यंत्रणेने हाती घेतले आहे. दरम्यान हा रोग लवकर आटोक्यात नाही आला तर देशावर दुधाचे संकट ओढवू शकते.
महाराष्ट्रात जळगाव, अकोला, अहमदनगर आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये लम्पी साथ मोठ्या प्रमाणात आली आहे. या जिल्ह्यांत 36 हजार गायींना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारने या साथीची गंभीर दखल घेत महाराष्ट्रासह नऊ राज्यांमध्ये गायींच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. राजस्थान, पंजाब, गुजरात, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात देखील लस देणे सुरू असून लाखो डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. लम्पीची साथ 2019 मध्येच खरे तर सुरू झाली. पश्‍चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या आजाराच्या पहिल्या रुग्ण गायी आढळल्या. मात्र तेव्हा भारतासह उभे जग कोरोनाशी झुंजत असल्याने ही साथ रडारवर आली नाही. गेल्या उन्हाळ्यात एलएसडीने पुन्हा डोके वर काढले आणि बघता बघता पश्‍चिम आणि उत्तर भारतातील दूध उत्पादक राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्रापासून काश्मीरपर्यंत पसरला आहे.

COMMENTS