Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, आमदारांच्या निवासासमोरच राहुटी टाकणार

किसन चव्हाण यांचा इशारा : पुलासाठी निधी मिळण्याची मागणी

शेवगाव तालुका : देशाच्या स्वातंत्र्यांला 75 वर्षे उलटून गेली तरी लोकांना जाण्यायेण्यासाठी नदी वर पूल होत नसेल, महिला, आजारी माणसं, शाळकरी मुलं, आ

विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा
आजकाल तृतीयपंथीयही आमदार होतात
धनी मला ही दाखवा ना विठूरायाची पंढरी !

शेवगाव तालुका : देशाच्या स्वातंत्र्यांला 75 वर्षे उलटून गेली तरी लोकांना जाण्यायेण्यासाठी नदी वर पूल होत नसेल, महिला, आजारी माणसं, शाळकरी मुलं, आणि काही वेळेस प्रेतही नदीच्या पाण्यातून उचलून न्यावी लागत असेल तर हा लोकांप्रतिनिधीचा नाकर्तेपणा आहे दहा वर्षे भाजपचे आमदार, भाजपचे खासदार, आणि गावची सत्ताही दहा वर्षे भाजपच्याच ताब्यात असेल आणि तरीही जाण्यायेण्या साठी ग्रामस्थांना जीवघेणी कसरत करावी लागत असेल तर ही भूषनावह बाब नाही. नदीवर पुलासाठी निधीची तरतूद झाली नाही तरे लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे यांच्या कासारपिंपळगाव येथील निवासस्थानी राहुटी टाकून मुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रा किसन चव्हाण यांनी दिला.
येत्या पंधरा दिवसात वाघोली येथील कुरण वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावर आणि आज वाघोली येथील तीनशे ते साडे तीनशे लोकसंख्या असलेल्या कुरण वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावर आणि नदीवर पुलाचे काम तात्काळ व्हावे, आमदार, खासदार निधी मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या व ग्रामस्थांच्या वतीने प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. कुरण वस्तीवरील शाळकरी मुलं, महिला ,ग्रामस्थ व वंचितचे कार्यकर्ते यांनी पाण्यात उतरून तीन तास आंदोलन केले .पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निधी मिळावा यासाठी केलेली शिफारस पत्र सह शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करु असे लेखी आश्‍वासन दिल्याने आंदोलनकर्ते पाण्यातून बाहेर आले. आंदोलनामध्ये वंचितचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, विशाल इंगळे, लक्ष्मण मोरे, सुनीता जाधव, प्रमोद गजभिव, नितीन गुंजाळ, सुंदर आल्हाट, सत्यदान आल्हाट, रवींद्र नीळ, बाळासाहेब काळपुंड, देविदास आल्हाट, अजिनाथ शिंदे, सोपान आव्हाड, दादासाहेब गाडेकर, अमोल आल्हाट, किशोर आल्हाट, भागीनाथ आल्हाट, देवा आल्हाट, शिंधूताई आल्हाट, मीरा आल्हाट, मोनिका आल्हाट, सुनीता आल्हाट, लता आल्हाट, देवदान आल्हाट, दिलीप आल्हाट,मार्कस आल्हाट, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ पाण्यात उतरून आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महादेव, भोसले, साबांचे उपाभियंता रामकृष्ण सरोदे, मंडळ अधिकारी ए.ए.फुलमाळी कामगार तलाठी जयश्री महामुनी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

COMMENTS