…तर, कर्मवीरांच्या शिक्षणरुपी वटवृक्षाला सुवर्णफळ लागेल : डॉ. सागर देशपांडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, कर्मवीरांच्या शिक्षणरुपी वटवृक्षाला सुवर्णफळ लागेल : डॉ. सागर देशपांडे

कोपरगाव प्रतिनिधी : मोबाईलमध्ये सेल्फी काढणं सोपं पण प्रत्यक्ष जीवनात स्वतःची इमेज तयार करणे महाकठीण असत. मात्र कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्

श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल
स्नेहआशा बालगृहांमधील बालकांच्या मुत्यूची चौकशी
अहमदनगरमध्ये लंके यांचाच डंका

कोपरगाव प्रतिनिधी : मोबाईलमध्ये सेल्फी काढणं सोपं पण प्रत्यक्ष जीवनात स्वतःची इमेज तयार करणे महाकठीण असत. मात्र कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन स्वत:ची इमेज तयार करणे अवघड नाही. त्यासाठी डॉ.आंबेडकरांप्रमाणे ज्ञानपिपासू विद्यार्थी होवून मिळालेल्या उत्तरावर परत प्रश्‍न विचारण्याचं धाडस निर्माण करा. ज्यावेळी सी.व्ही. रामन यांच्यानंतर भारतात राहून नोबेल मिळवणारा विद्यार्थी ज्या दिवशी घडेल त्या दिवशी कर्मवीरांच्या शिक्षणरुपी वटवृक्षाला सुवर्णफळ लागेल असे प्रतिपादन ‘जडणघडण’ या सुप्रसिद्ध मासिकाचे मुख्य संपादक आणि प्रथितयश लेखक डॉ.सागर देशपांडे यांनी केले आहे.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अ‍ॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, पद्मा मेहता प्राथ. कन्या विद्यामंदिर, डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर व कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय या पाच शाखांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 135 वा जयंती सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सागर देशपांडे उपस्थित विद्यार्थ्यांना उदबोधित करतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे होते. ते पुढे म्हणाले की, कर्मवीरांनी स्वावलंबन, श्रमनिष्ठा, स्वाभिमान अशी मुल्ये रुजवितांना ‘कमवा आणि शिका’ योजना सुरु करून समाजाला नवी तत्वे दिली. स्कील एज्युकेशन म्हणजेच कौशल्ययुक्त शिक्षणाचा पाया घातला. यामुळेच कर्मवीरांच्या रयतला राजा सयाजीरावांसारख्या थोरांचा आधार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यासारख्याची मदत मिळाली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना अ‍ॅड.भगीरथ शिंदे म्हणाले की, कोणतीही संस्था केवळ विद्यार्थी संख्येवरून मोठी ठरत नाही. तर मुल्यजतन व जोपासणा यावरून ती मोठी ठरत असते. 105 वर्षे होऊनही पद्मभूषण कर्मवीर आण्णा व वहिनींनी ठरविलेल्या मूल्यांशी तडजोड रयत शिक्षण संस्थेने केलेली नाही. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे, माजी आ.अशोकराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बिपिनदादा कोल्हे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य चैताली काळे व विवेक कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी सदस्य पद्माकांत कुदळे, कारभारी आगवण, मच्छिंद्र रोहमारे, बाळासाहेब कदम, संदीप वर्पे, अरुण चंद्रे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील गंगुले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाखाप्रमुख प्राचार्य डॉ. रमेश सानप, सुरेश कातकडे, मंजुषा सुरवसे, सुभाष दरेकर, नंदकुमार खाडे महाविद्यालयातील तीनही शाखांचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, प्रा.अरुण देशमुख, डॉ.अरविंद भागवत तसेच प्रा.रामभाऊ गमे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रमेश सानप यांनी केले. व पाहुण्यांचा परिचय डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक सुरेश कातकडे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.छाया शिंदे व डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले. सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पाचही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळ – कोपरगाव येथे पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलतांना डॉ.सागर देशपांडे समवेत कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड .भगीरथ शिंदे व मान्यवर.

COMMENTS