Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा

नागपूर ः राज्यातील आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपवर खोचक टीका करतांना दिसून येत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अन

नवीन नवरदेव बाशिंग बांधून तयार
आरोग्य विभागाचा 3200 कोटींचा घोटाळा ?
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाबळेश्‍वरमध्ये 640 एकर जमीन हडपली

नागपूर ः राज्यातील आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपवर खोचक टीका करतांना दिसून येत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक जण, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याच्या टीकेनंतर शिंदे गट भाजपमध्ये शंभर टक्के विलीन होणार असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच भाजपची चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कळेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले शिंदे गटाकडे भाजपमध्ये सामील होण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण ते स्वबळावर निवडणूक लढू शकणार नाहीत. याशिवाय भाजपही त्यांना स्वबळावर लढू देणार नाही. भाजपला 288 जागा या कमळावरच लढायच्या आहेत. हे सर्व जण मोहरे असून भाजपची चाल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कळेल. भाजपचा 288 जागा लढवण्याचा प्लॅन नक्की आहे असे वडेट्टीवार म्हणाले. यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील काँग्रेसच्या रॅलीवरुन केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांचा चष्मा हा जवळचा आहे लांबचा नाही. त्यामुळे रॅली लांब होती जी त्यांना दिसली नसेल. त्यांचा चष्मा रिडिंगचा आहे ज्याचा जसा चष्मा तसे त्यांना दिसते’ असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. काँग्रेस लोकसभेच्या 22 जागा लढवणार असल्याच्या चर्चांवर ही त्यांनी स्पष्टीकरण दिले. काँग्रेसने किती जागा लढाव्यात यावर मी बोलणार नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीत जे ठरेल ते आम्हाला मान्य आहे असे विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेचा निकालाची तारीख जवळ येत आहे. या निकालाआधीच शिवसेना शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लान बी तयार ठेवल्याचे म्हंटले जात आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे.

COMMENTS