Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

..तर, महाराष्ट्र पेटून उठेल – शरद पवार

महाविकास आघाडीच्या महामोर्चाचा केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई/प्रतिनिधी ः महापुरुषांचा अवमान करणार्‍या राज्यपाल कोश्यारी यांना हटवा, तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीकडून

राजीनामा मागे घेण्याचे संकेत ?
बंडखोरांनी माझा फोटो वापरू नये
शरद पवारांची प्रकृती स्थिर

मुंबई/प्रतिनिधी ः महापुरुषांचा अवमान करणार्‍या राज्यपाल कोश्यारी यांना हटवा, तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीकडून शनिवारी महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष यांनी सडकून टीका केली.  महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या वाचाळ नेत्यांवर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे.


 महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि इतर पक्ष आणि संघटना सहभागी झाले. त्यामुळे काही काळ मुंबईत वाहतूक कोंडीही झाली. मोर्चाचा शेवट शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, संजय राऊत यांच्या भाषणांनी झाला. महामोर्चाला संबोधित करतांना पवार म्हणाले की, आजचा मोर्चा वेगळ्या स्थितीचे दर्शन करतोय. मला आठवतेय 70 वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावर मुंबईत लाखोंचे मोर्चे निघाले. बेळगाव, कारवार, निपाणीचा महाराष्ट्रात सहभागी व्हावी, ही महाराष्ट्रवासीयांची मागणीय. या मोर्चाला लाखोंची शक्ती का आली, कारण महाराष्ट्राच्या सन्मासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आम्ही एकवटलो आहोत, बिहार, उत्तर प्रदेशात महात्मा फुले यांचे नाव आदराने घेतले जाते, परंतु महाराष्ट्रात सरकारमधील मंत्र्यांसह राज्यपालही शिवराय, शाहू, फुले आणि आंबेडकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतायेत. यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यायला हवी, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. ज्या लोकांच्या हातात सत्तेची चावी आहे, अशीच लोक महापुरुषांचा अपमान करत आहेत. साडेतीनशे वर्षे झाली तरी महाराजांचे नाव अद्यापही अखंड आहे. त्यामुळे त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सत्ताधारी नेत्यांनी अनेक महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलीत. परंतु अजून कुणीही माफी मागितलेली नाही. त्यामुळे या नेत्यांनी माफी मागावी, नाही तर राज्यातील तरुण शांत बसणार नाही, असेही पवार म्हणाले.


दरम्यान, यावेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे म्हणाले की, कर्नाटक असो वा आणखी कोणी असोत, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत. या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकीय शेवट करणार. आजचा मोर्चा त्याची सुरुवात आहे. ज्यांनी-ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जगानं हे दृश्य पहिल्यांदाच पाहिले. संयुक्त महाराष्ट्रासाठी असाच संघर्ष करावा लागला. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रद्रोह्यांचा छाताडावर चालण्याची वेळ – उद्धव ठाकरे
महामोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. माझ्याबरोबर लाखो महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची ही वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर पहिल्यांदाच मुंबईत असे दृष्य दिसले, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे. महापुरुषांच्या अपमानाविरोधात सर्व पक्ष एकवटलेत, परंतु महाराष्ट्रद्रोही शांत आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार्‍या तोत्यांनी खुर्चीसाठी दिल्लीची लाचारी केली. कोश्यारींना मी राज्यपाल मानत नाही. त्या पदावर बसून कुणीही टपल्या माराव्यात, हे आम्ही सहन करणार नाही. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना लाज नाही वाटत?, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर प्रहार केला आहे.

मविआचा मोर्चा अपयशी ठरला : फडणवीसांची टीका
महाविकास आघाडीचा मोर्चा असफल झाला आहे. तीन पक्ष एकत्र येऊनदेखील आजची संख्या पाहता हा मोर्चा ड्रोन श़ॉटलायक देखील नव्हता, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आलेच नाही. विशेष म्हणजे तीन पक्ष मिळून हा विराट मोर्चा असल्याचे सांगितले जाते. परंतू तसे मुळात अजिबात नाही. हा मोर्चा अतिशय मिनी असल्याची टीका केली.

COMMENTS