Homeताज्या बातम्यासंपादकीय

तर, रामाच्या नावाने….. 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा जसजसा जवळ येत आहे, तसतसा या विषयावर अधिक चर्चा जनमानसात घडावी, प्रयत्न कुणाचा नसला तरी, राजकारणातील समाजकारण उम

सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय आणि टायमिंग ! 
चिदम्बरम – फडणवीस सांस्कृतिक ऐक्य!
एव्हढी आदळ आपट कशासाठी?

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा जसजसा जवळ येत आहे, तसतसा या विषयावर अधिक चर्चा जनमानसात घडावी, प्रयत्न कुणाचा नसला तरी, राजकारणातील समाजकारण उमगलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य खोटे ठरविता येत नाही. तसं पाहिलं तर, राम क्षत्रिय होते. क्षत्रिय हाच राजा होऊ शकतो, असा धर्मनियम असणाऱ्या काळात रामाने दिलेल्या शब्दाला सत्य ठरविण्यासाठी चौदा वर्षे वनवास पत्करला. याकाळात राज्याची सूत्रे स्विकारण्यासाठी त्यांचे मन वळविले गेले व, पण, दिलेला शब्दाचे पालन हा माझा राजधर्म असल्याचे म्हटले. आज रामाच्या नावावर पुन्हा सत्तेवर येईन म्हणणाऱ्यांनी यापूर्वी भारतीय लोकांना दिलेले शब्द खरे ठरवले का,याचं सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. असो. राम क्षत्रिय आहेत. क्षत्रिय हे मांसाहार करतात. भारतात राम-कृष्ण ही धर्माच्या क्षेत्रातील लोकप्रिय जोडी. रामाचा काळ पाहिला तर त्यावेळी या भूमीत आर्य समुदाय मांसाहार करित होता. याचे प्राचीन इतिहासात अनेक पुरावे आहेत. कृष्णाचा उदय आर्यांनी यज्ञात जो पशूबळी दिला जात होता, विशेषतः गोवंश बळी, त्याविरोधात कृष्णाने आवाज उठवला होता. कृष्ण हे यादव गणाचे म्हणजे आजचा ओबींसीं समुदाय. खासकरून शेती करणारे. शेती करणारा समुदाय असल्याने कृष्णासह यादव गण शाकाहारी होता. यज्ञातील गोवंश बळी देण्यास कृष्णाने केलेला विरोध तत्कालीन आर्य समुदायाला रूचला नाही. त्यामुळे, कृष्णाविषयी त्याच आर्य समुदायाने अनेक बदनामीकारक अफवा पसरवल्या. मात्र, कृषीप्रधान समाजाचा घटक असलेल्या कृष्णाची लोकप्रियता जराही कमी झाली नाही. परिणामी, आर्यांना कृष्णाचा स्विकार करावाच लागला. राम आणि कृष्ण यांची ऐतिहासिक तुलना केली तर, त्यांच्या आहारात नियमितपणे फरक होता. कृष्णाने गोवंश बंदीचा केलेला आग्रह आर्यांना मांसाहार करण्यापासून रोखणारा ठरला. क्षत्रिय समाजात शिकारी असणं हा एक नियम होता. या नियमाला क्षत्रिय समाजात कोणीही अपवाद नव्हता. रामाला शिकार करण्यासाठी सिता ने आग्रह केल्याचे आपण लहान पणापासूनच रामायणात वाचत आलो आहोत. एखाद्या प्राण्याचे कातडे केवळ कापड म्हणून वापरणे, एवढ्याच एका कारणासाठी हरिणाची शिकार करावयास रामाला भाग पाडले असेल, असे संभवत नाही. रामाला शिकार येत होती आणि शिकार वन्य प्राण्यांची केवळ बहादुरीसाठीच नव्हे तर, आहारासाठीही केली जात असावी. जितेंद्र आव्हाड यांनी नेमका हाच मुद्दा अप्रत्यक्षपणे उपस्थित केला आहे. अर्थात, यावर मोकळेपणाने चर्चा करायला कोणीही धजत नाही. अर्थात, अशा प्रकारच्या चर्चेत वादग्रस्तता यावी यासाठी चर्चा आवश्यक नाही, तर, आमच्या येणाऱ्या पिढ्यांना यावर योग्य ते ज्ञान मिळावे, यासाठी चर्चा होणे गैर नाही. अजूनही आपण लोकशाही मध्ये वावरत आहोत. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावल्या सारखे आपण का वागत आहोत? त्यासाठी आपल्यावर कोणी दबाव आणतो आहे का? तसे असेल तर मग दबाव झुगारला पाहिजे. सुदृढ चर्चा हा कोणत्याही प्रश्नावर एक चांगला प्राथमिक उपाय देखील असतो.‌ अर्थात, रामाच्या नावाने शासन यंत्रणा लोकांच्या वैयक्तिक आहारावर काही वेळेसाठी बंदी आणत असतील तर, त्यावर लोक व्यक्त होतील! आणि त्यांनी व्यक्त व्हावचं! कारण, या देशातील लोक जर रामभक्त आहेत, तर, ते रामाच्या गुणांना आपसूकच स्विकारतील! त्यासाठी कोणी सक्ती करण्याची गरजच काय? रामाच्या नावाने केल्या जाणाऱ्या सक्तीला लोक हुकूमशाही संबोधतील एवढा दर्जा प्रचारकांनी गाठू नये.

COMMENTS