Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्र्यम्बकेश्वर येथे ज्ञानरचना सोशल फाउंडेशन तर्फे  सर्पदंश कार्यशाळा संपन्न

त्र्यम्बकेश्वर प्रतिनिधी - सर्पदंश व त्याचे लक्षण तसेच त्यावरील प्रथमोपचार,सापांची ओळख,सापांच्या विषयाचे शरीरावर होणारे परिणाम या विषयावर उद्बोध

आरोपीची अटक ईडीसाठी होणार अवघड  
शरद पवार पुन्हा नाशिकच्या होम पिचवर
पुण्यात कोयत्याने वार करून तरूणाची हत्या

त्र्यम्बकेश्वर प्रतिनिधी – सर्पदंश व त्याचे लक्षण तसेच त्यावरील प्रथमोपचार,सापांची ओळख,सापांच्या विषयाचे शरीरावर होणारे परिणाम या विषयावर उद्बोधन पर कार्यशाळेचे आयोजन श्रीमती जाईबाई धर्मशाळा त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी दिनांक 28 जुलै 2024 रोजी करण्यात आलेले होते. त्र्यम्बकराज वारकरी शिक्षण संस्था ,जय बाबाजी वारकरी शिक्षण संस्था  ,ज्ञानसाधना वारकरी शिक्षण संस्था ,  श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर येथे शिक्षण घेणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. 

     यावेळी ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या डायरेक्टर सौ सुप्रिया महेंद्र चौधरी यांनी प्रास्तविकात संस्थेच्या कार्याविषयी विस्तृत माहिती देत असताना संस्थेच्या महिला सक्षमीकरण अंतर्गत आधार फॅशन डिझाईन अहमदनगर स्थित उपक्रम  तसेच शैक्षणिक साहित्य बँक या उपक्रमांमधून प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले तसेच ही कार्यशाळा समाजातील सर्पदंशाबाबत असणारे गैरसमज व त्यावरील प्रथमोपचार याविषयी जागृती निर्माण करणे , सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठीअशाच प्रकारच्या कार्यशाळा संपूर्ण राज्यभर घेत जनजागृती करणे हा उद्देश विस्तृतपणे मांडला या कार्यशाळेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्र्यंबक नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसेच त्रंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टी माननीय श्री स्वप्निल शेलार तसेच प्रमुख मान्यवर म्हणून वनविभागाचे अधिकारी त्र्यंबकेश्वर नाशिक माननीय श्री भाऊसाहेब निंबेकर उपस्थित होते.  वनविभाग अधिकारी निंबेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाषणामध्ये  परिपूर्ण ज्ञाना शिवाय कोणतेही कार्य करणे धोकादायक असते हे विविध उदाहरणांमधून पटवून दिले

 या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक श्री नितीश भांदक्कर,  श्री गौरंग वायकर , श्री किरण बावस्कर वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी नागपूर च्या टीमने  प्रमुख भूमिका पार पाडत विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले  कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी हभप गोविंद शिरोळे महाराज तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री अंकुश परदेशी यांनी विशेष सहयोग केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानरचना सोशल  फाऊंडेशनचे डायरेक्टर श्री प्रविण साळवे यांनी केले तर प्रास्ताविक ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या डायरेक्टर सौ सुप्रिया चौधरी यांनी केले

COMMENTS