भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि बॉलीवूडगायक पलाश मुच्छल यांच्या नात्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. मात्र, या जोडप्याने क
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि बॉलीवूडगायक पलाश मुच्छल यांच्या नात्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. मात्र, या जोडप्याने कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितले नाही. पण, आता LIVE कॉन्सर्ट दरम्यान पलाशने सर्वांसमोर आपले मन मोकळे केले आणि स्मृती मानधना त्याची गर्लफ्रेंड असल्याचे जाहीर केले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील नात्याबद्दल सर्वांनाच माहिती होती, मात्र या जोडप्याने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही. पण, आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पलाश हजारो लोकांसमोर आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पलाशच्या लाइव्ह कॉन्सर्टचा आहे, ज्यामध्ये त्याची बहीणही एकत्र दिसत आहे. यावेळी त्यांनी मंचावर हजारो लोकांसमोर स्मृतींवरील प्रेम व्यक्त केले. व्हिडिओमध्ये पलाशने स्मृतीला त्याची गर्लफ्रेंड म्हणून सांगितले आणि तिच्यासाठी एक गाणे गायले. क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक-गायक पलाश यांनी सोशल मीडियावर अनेकदा एकत्र फोटो शेअर केले आहेत. इतकेच नाही तर ते दोघेही नुकतेच इंग्लंडमध्ये होते आणि त्यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले फोटोही त्याच पार्श्वभूमीचे होते, ज्यामुळे ते दोघे एकत्र सुट्टी घालवत असल्याचे स्पष्ट होते. आता, जेव्हा पलाशने स्टेजवर आय लव्ह यू टू म्हंटले आहे, तेव्हा चाहत्यांचा अंदाज आहे की कदाचित स्मृतीने पलाशला आधी प्रपोज केले असेल, ज्याला त्याने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये उत्तर दिले आहे. बातम्यांवर विश्वास ठेवला तर हे दोघे 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
COMMENTS