Homeताज्या बातम्यादेश

रेमल चक्रीवादळाचा धुमाकूळ  

मिझोरममध्ये दगडाची खाण कोसळून 15 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली ः बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीवर 120 किमी प्रतितास वेगाने धडकलेल्या चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळामुळे बा

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी साधला संवाद
शिवसैनिक मरायला आणि मारायला तयार आहे| LOK News 24
राज्यात दुष्काळ सदृश्य आणि मंत्री मात्र अदृश्य

नवी दिल्ली ः बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीवर 120 किमी प्रतितास वेगाने धडकलेल्या चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळामुळे बांगलादेशात शेकडो गावे पाण्याखाली गेल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर वीजपुरवठा खंडित झाल्याने देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे भारतामध्ये प. बंगालमध्ये किमान 3 जणांचा मृत्यू झाला. मिझोराममध्ये रेमल चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडत असून, मंगळवारी सकाळी सहा वाजता राजधानी आयझॉलमध्ये दगडाची खाण कोसळली. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. 10 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. ही घटना आयझॉलच्या मेल्थम आणि हॅलिमेन यांच्यात घडली.

यासंदर्भात मिझोरमचे डीजीपी अनिल शकला यांनी सांगितले की, आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापैकी सात स्थानिक आहेत, तर तीन इतर राज्यातील आहेत. ढिगार्‍याखाली आणखी अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे अडचणी येत आहेत. सततच्या पावसामुळे मिझोराममधील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालये मंगळवारी बंद ठेवण्यात आली आहेत. खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात इतरही अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. सालेम वेंग, आयझॉल येथे भूस्खलनानंतर एक इमारत पाण्याने वाहून गेल्याने तीन लोक बेपत्ता आहेत. त्यांचाही शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, हुंथरमधील राष्ट्रीय महामार्ग-6 वर भूस्खलनामुळे आयझॉलचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटला आहे. राज्यातील अनेक राज्य महामार्गही बंद आहेत. सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. नदीकाठच्या भागात राहणार्‍या अनेकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.  पोलिसांनी सांगितले की, हुंथरमधील राष्ट्रीय महामार्ग-6 वर भूस्खलनामुळे आयझॉलचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटला आहे. राज्यातील अनेक राज्य महामार्गही बंद आहेत. सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. नदीकाठच्या भागात राहणार्‍या अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

दरम्यान, मिझोरामशिवाय ईशान्य भारतातील आसाम, मेघालय या राज्यांनाही वादळाचा तडाखा बसला आहे. आसाममधील हाफलांग आणि सिलचर दरम्यानचा रस्ता वादळामुळे वाहून गेल्यामुळे दळणवळण विस्कळित झाले आहे. रेमल चक्रीवादळाने पश्‍चिम बंगालच्या दक्षिण किनारपट्टी भागात थैमान घातले. येथील 24 विभाग, 79 पालिका प्रभागांतील सुमारे 15 हजार घरांचे ‘रेमल’ चक्रीवादळाने नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

30 मेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा – हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये रेमन चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागला. आसामसह ईशान्येकडील काही राज्यांमध्ये सोमवारपासून पाऊस सुरू आहे. काल गुवाहाटीमध्ये 14 आणि त्रिपुरामध्ये 11 उड्डाणे रद्द करण्यात आली. पश्‍चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये 30 मे पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 29 आणि 30 मे रोजी आसाम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

COMMENTS