नागपूर प्रतिनिधी - नागपुरात उन्हाळ्यात तापमान ४५ डिग्री वर असतो अश्यात वाहतूक पोलीस यांना कर्तव्य बजावत असताना उन्हाचा मोठा त्रास सहन कराव ल

नागपूर प्रतिनिधी – नागपुरात उन्हाळ्यात तापमान ४५ डिग्री वर असतो अश्यात वाहतूक पोलीस यांना कर्तव्य बजावत असताना उन्हाचा मोठा त्रास सहन कराव लागतो. यासाठी नागपुर शहरात वाहतुक पोलीसांसाठी स्मार्ट पोलीस बुथ देण्यात येत आहे.नागपूर शहरातील चौकाचौकात असलेल्या बहुतांश वाहतूक पोलिसांच्या बूथची अवस्था बिकट झाली आहे. आता स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना स्मार्ट पोलिस बूथ देण्यात येत असून, लवकरच ते विविध चौकात बसवण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.या बूथच्या आत आणि बाहेर सेन्सर लावण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे हे सौरऊर्जेद्वारे चालवले जाईल, तर बूथमध्ये कोणी नसेल तर दिवे आणि पंखे आपोआप बंद होतील. नागपूर पोलिसांनी यासाठी शहरातील 75 ठिकाणे निश्चित केली आहेत. मात्र, सुरुवातीला 20 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ते बसवण्यात येणार आहे. त्यानंतर अभिप्रायाच्या आधारे ते शहरातील इतर भागात बसविण्यात येणार आहे.
COMMENTS