जगभरातील अर्थव्यवस्था सध्या महागाई आणि आर्थिक मंदीमुळे प्रभावित झाल्याअसून, त्यांच्याकडून कामगार कपातीचे धोरण राबविण्यात येत आहे. एकीकडे कोरोनानं
जगभरातील अर्थव्यवस्था सध्या महागाई आणि आर्थिक मंदीमुळे प्रभावित झाल्याअसून, त्यांच्याकडून कामगार कपातीचे धोरण राबविण्यात येत आहे. एकीकडे कोरोनानंतर जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था सावरत असतांना, दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धाचे सावट आणि त्यातच महागाईचा वाढता डोलारा आणि त्या त्या देशांची आर्थिक धोरणे यामुळे अर्थव्यवस्था प्रभावित होत असून, त्यातून सावरण्यासाठी कंपन्यांकडून कामगार कपातीचे धोरण राबविण्यात येत आहे. त्यामुळे बेरोजगारीचा दर मोठया प्रमणावर वाढत चालला आहे.
ब्रिटन, अमेरिका, युुुरोपीय देशांना मोठा फटका बसतांना दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आयात-निर्यातीवर मोठा परिणाम होतांना दिसून येत आहे. परिणामी अर्थव्यवस्था मदींच्या फेर्यात अडगद चालली आहे. जागतिक आर्थिक मंदीची लक्षणे आता पूर्वीपेक्षा अधिक गडद झाली आहेत. त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. विशेषत: भारतीय स्टार्ट अप्स आर्थिक मंदीमुळे अधिक त्रस्त झाले आहेत. या कारणास्तव कंपन्यांनी कर्मचारी कपातीच्या मार्गाचा अवलंबला आहे. गेल्या काही वर्षात भारतातील किमान 82 स्टार्ट अप्स कंपन्या बंद झाल्या. त्यामुळे हजारो कर्मचार्यांना नोकरीस मुकावे लागले आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. कोरोनानंतर बाजारपेठेत सुधारणा होताना काही दिवस जाणवले. मात्र, त्यात सुधारणा न होता त्यात बिघल्याचे दिसून येत आहे.
जगभरातील स्टार्ट अप्सच्या माध्यमातून सुरु असलेल्या कंपन्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यातच सरकारची धोरणे मोठ्या उद्योगपतींना पायघड्या घालताना स्टार्ट अप्स कंपन्यांना पाठबळ कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये जगभरातील स्टार्ट अप्स कशातरी टिकून राहिल्या. मात्र, अनलॉक झाल्यानंतर या कंपन्यांना बाजारपेठेतून हवा तसा मोबदला मिळताना बर्याच अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अडचणीत येण्यापेक्षा कामगारांच्या पगारावरील खर्च कमी करण्याच्या सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू आहे. टेक कंपन्यांमध्ये या वर्षी जानेवारीमध्ये 84,714 लोकांना कामावरून काढण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये आर्थिक स्थितीमध्ये अस्थिरता असल्याने 36,491 कर्मचार्यांना कामावरून काढण्यात आले होते. आकडेवारी दर्शवते की जगभरातील टेक कंपन्यांनी या वर्षात आतापर्यंत 1.50 लाखांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकले आहे. स्टार्ट अप्सच्या प्रकल्पावर नजर टाकली तर, बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, या वर्षात आतापर्यंत 16 स्टार्ट अप्सनी त्यांच्या 100 टक्के कर्मचार्यांना काढून टाकले आहे. यापैकी तीन स्टार्ट अप कंपन्या भारतातील असल्याचीही नोंद आहेत. बेंगळुरू-आधारित वुई ट्रेड आणि ड्यूक्स एज्युकेशन आणि चेन्नई-आधारित फिपोला यांनी त्यांच्या सर्व कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे. भारतीय स्टार्ट अप्समधील कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय स्टार्ट अप्समध्येही, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक कर्मचारी कपात होत आहे. होम इंटिरियर कंपनी लाईव्ह स्पेसने अलीकडेच सुमारे 100 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. त्याचप्रमाणे, दुकानने कपातीच्या दुसर्या फेरीत 60 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. हेल्थकेअर युनिकॉर्न प्रिस्टिन केअरने 350 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे. ग्लोबल डिलिव्हरी मॅनेजमेंट कंपनी फारआयने फेब्रुवारी महिन्यात 90 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. सोशल मीडिया कंपनी शेअरचॅटने आपल्या 20 टक्के कर्मचार्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या प्रकारामध्ये नव्याने सुरु झालेल्या स्टार्ट अप्स कंपन्यांनी काढून टाकलेल्या कर्मचार्यांना सुरक्षिततेची हमी मिळत नाही, त्यामुळे कर्मचार्यांना कामावरून कमी करण्यात येत आहे. मात्र यामुळे बेरोजगारी वाढण्याचे सकेत दिसून येत आहे.
COMMENTS