Homeताज्या बातम्यासंपादकीय

अस्मानी संकट

राज्यात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांचे, फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या अवकाळीमुळे शेत

रुपयाची अस्थिरता…
राज्यपालांसाठी मार्गदर्शक सूचनांची चाचपणी
वाढते अपघात चिंताजनक

राज्यात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांचे, फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या अवकाळीमुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा रस्त्यावर आलेला दिसून येत आहे. कांदा, टॉमटो, फळ भाज्या, द्राक्षे, यासह अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीतून सावरत शेतकरी यंदा रब्बी हंगामात तरी पिक जोमाने येऊन नुकसान भरून निघेल अशी शेतकर्‍यांची अपेक्षा होती, मात्र खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम देखील शेतकर्‍यांच्या मुळावरच उठल्याचे दिसून येत आहे. गहू, मका आडव्या झाल्याचे चित्र या अवकाळी पावसामुळे झाल्याचे दिसून येत आहे. द्राक्षाच्या बागांमध्ये द्राक्षे ओस पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निसर्गाच्या अवकृपेने झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी सावरायचे कसे हा महत्वाचा प्रश्‍न आहे. राज्यात ऐन मान्सूनच्या काळामध्ये पाऊस सक्रिय होण्यास झालेला विलंब आणि त्यानंतर लांबलेला पाऊस यामुळे अनेक जिल्ह्यात, तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुष्काळीमुळे शेतकर्‍यांचे, बँकांचे कर्ज फेडायचे, हा शेतकर्‍यांसमोर प्रश्‍न उभा ठाकला होता. मराठवाडा, विदर्भात तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. दररोज शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येतांना दिसून येत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना अजूनही अपुर्‍या असतांना, पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या दारात दुसरे संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी सावरायचे कसे हा महत्वाचा प्रश्‍न आहे. रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान केले. त्यामुळे शेतकर्‍यांना खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. शेतकर्‍यांवर आलेले अस्मानी संकटातून शेतकर्‍याने कसे सावरायचे हा महत्वाचा प्रश्‍न आहे. खरीप हंगामामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांनी घेतलेले कर्ज कसे चुकवायचे हा प्रश्‍न असतांना, पुन्हा एकदा निसर्गाने घातलेल्या धुमाकुळीमुळे शेतकर्‍यांच्या हाता-तोंडात आलेला घास निसर्ग हिरावून घेतांना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.  शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नसून 3 हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली असली तरी, नुकसान भरपाई कधी मिळणार हा महत्वाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची खरी गरज आहे. बाधित शेतकर्‍यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत तातडीने मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिरायतीसाठी हेक्टरी 8,500 रुपये, सिंचनाखालील पिकांसाठी हेक्टरी 17 हजार रुपये व बागायतींसाठी हेक्टरी 22,500 रुपये मदत दिली जाणार आहे. मात्र मदत कधी मिळणार हा प्रश्‍न आहे. कारण गेल्या वर्षीतील अतिवृष्टीने पैसे अजूनही शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे सरकारने मदतीचा हात देत दिलासा दिला असला तरी, प्रत्यक्षातील मदत कधी मिळेल सांगता येत नाही. खरंतर शेतकर्‍यांनी गारपीट आणि दुष्काळाचा चक्रव्यूह भेदून तळहाताच्या फोडाप्रमाणे द्राक्षबागा, फळबागा जगवल्या होत्या. मात्र, निसर्गाने आपल्या लहरीपणाची वक्रदृष्टी कायम ठेवली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसाबरोबर, गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान केले आहे. अवकाळी पावसाने होतं, नव्हंते सगळे गिळंकृत केले आहे. त्यामुळे बँकांचे कर्ज, सावकारांकडून घेतलेले कर्ज, हातउसने घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा शेतकर्‍यांसमोर प्रश्‍न आहे. मुलींचे लग्न, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, याचबरोबर दररोजचा खर्च कसा भागवायचा हा शेतकर्‍यांसमोर यक्षप्रश्‍न आहे. त्यातच वाढलेली महागाई यामुळे शेतकरी कोलमडून पडतांना दिसून येत आहे. 

COMMENTS