Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

दोन जवानांना वीरमरण दोन दिवसांपासून चकमक सुरूच

श्रीनगर ः जम्मू-काश्मीरच्या कुलगामध्ये रविवारी देखील सलग दुसर्‍या दिवशी दहशतवाद्यांसोबत चकमक सुरूच आहे. मुदरघम आणि चिनिगम फ्रिसालमध्ये आतापर्यंत

  नाशिकची धुळवड आणि जीवनाची परवड ! 
अदानी आणि मोदी दोघे एकच
 कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी

श्रीनगर ः जम्मू-काश्मीरच्या कुलगामध्ये रविवारी देखील सलग दुसर्‍या दिवशी दहशतवाद्यांसोबत चकमक सुरूच आहे. मुदरघम आणि चिनिगम फ्रिसालमध्ये आतापर्यंत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले असून, या घटनेत दोन भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. मुदरघममध्ये दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची आणि चिनीगाम फ्रिसलमध्ये आणखी एक दहशतवादी लपल्याची शक्यता असून, रविवारी देखील भारतीय लष्कराकडून शोधमोहीम सुरूच होती.
रविवारी सकाळी मुदरघममध्ये एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. येथे शनिवारी (6 जुलै) दुपारी दहशतवाद्यांशी लढताना एका जवानाला वीरमरण प्राप्त झाले होते. कुलगामच्या चिनिगाम फ्रिसलमध्ये काल चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दुसरीकडे, रविवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला. जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी घनदाट जंगलातून पळून गेले. लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरला मोदरगाममध्ये दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची विशिष्ट माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली होती. ज्या घरात दहशतवादी लपले होते ते घर सील करण्यात आले. शोध मोहिमेदरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि सुरुवातीच्या गोळीबारात एक जवान गंभीर जखमी झाला, ज्याचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर लगेचच अधिक सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले आणि प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. आज सकाळी शोध मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर आणखी दहशतवादी मारले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे शोध मोहीम सुरू आहे. चिनीगाममधील आणखी एका कारवाईत सुरक्षा दलांना चार दहशतवाद्यांना ठार करण्यात मोठे यश मिळाले, परंतु गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे. 

COMMENTS