Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कंटनेरच्या धडकेत सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावरील घटना

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे जिल्ह्यातील खडवली फाट्यावजवळ भरधाव वेगातील एका कंटेनरने रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असणार्‍या

पुण्यात रस्त्याने चालत जाणाऱ्या शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं
खड्ड्यात चाक गेल्याने दोन वाहनात अपघात
कर्नाटकात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे जिल्ह्यातील खडवली फाट्यावजवळ भरधाव वेगातील एका कंटेनरने रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असणार्‍या टॅक्सीला जोरदार धडक दिली. त्यात 6 विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला. तर 6 जण गंभीर जखमी झालेत. मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास हा अपघात झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, तो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, ठाणे जिल्ह्याली पडघे येथून काही विद्यार्थी काळी-पिवळी टॅक्सीतून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते. ही टॅक्सी खडवली फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रेलरने तिला जोरदार धडक दिली. त्यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. जखमींना लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विद्यार्थी पडघे येथून रेल्वेने जाण्यासाठी जीपमधून जात होते. त्यांची ट्रेन चुकू नये यासाठी जीप चालकाने जीप वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला. ही घाईच त्यांच्या जीवावर बेतली. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण विद्यार्थी असल्याची माहिती उजेडात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेनंतर जीप तब्बल 60 फूट दूरपर्यंत फरफटत गेली. खडवली फाट्याजवळ यापूर्वीही एका ट्रेलरने आईस्क्रीमच्या गाडीला धडक दिली होती. त्यात 1 जण मृत्यू झाला होता. त्यानंतर आज मंगळवारी पुन्हा या ठिकाणी ट्रेलरने टॅक्सीला जोरदार धडक दिल्याने 6 जणांना प्राण गमवावे लागले.

COMMENTS