Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाळवणीजवळील अपघातात सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. हा अपघात नगर-कल्याण मार्गावर पहाटेच्या सुमारास झाला आहे. एक कार, बस आण

पुणे मुंबई लेन एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात.
धुळ्यातील अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू
मेव्हण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष वैद्य यांच्या कारला अपघात 

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. हा अपघात नगर-कल्याण मार्गावर पहाटेच्या सुमारास झाला आहे. एक कार, बस आणि ट्रॅकरची जोरदार धडक झाली असून यात 6 जण ठार झाले आहे. तर काही जण जखमी झाले आहे. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या अपघातांतील मृतांमध्ये दोघे जण पारनेर तालुक्यातील तर तिघेजण संगमनेर तालुक्यातील एक जण पाथर्डी तालुक्यातील आहे. या अपघातात निलेश रावसाहेब भोर (दसवडे), प्रकाश रावसाहेब थोरात (वारणवाडी, ता.पारनेर) अशोक चिमा केदार, जयवंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्मण पारधी (जांबुत खुर्द, ता.संगमनेर) सचिन कांतीलाल मंडलीचा (टाकळी मानूर, ता.पाथर्डी) हे मयत झाले आहेत. भनगडेवाडी व ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे काम पारनेर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगर कल्याण मार्गावर पहाटेच्या सुमारास उस वाहतूक करणारा ट्रक्टर, एक कार आणि ठाणे – मेहकर एस.टी बस यांची या मार्गावरील ढवळपुरी फाट्याजवळ जोरदार धडक झाली. तिन्ही वाहने भरधाव वेगात एकमेकांना धडकल्याने वाहनांचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार झाले आहे. तर काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज येताच स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरील प्रवासी वाहनांमधील नागरिक मदतीसाठी धावले. तसेच या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघातातील जखमी झालेल्यांना तातडीने प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती स्थिर तर काहींची चिंताजनक आहे.

COMMENTS