Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहेब तुम्ही राज्यात फिरा; गुजरात धार्जिण्य, जातीयवादी युतीचे सरकार खाली खेचा

तालुक्यातील मतदार, कार्यकर्ते, माता-भगिनींच्या भावनाइस्लामपूर / प्रतिनिधी : साहेब, तुम्ही मतदार संघाची अजिबात चिंता करू नका. आम्ही आपला हा गड ल

पानवळवाडी येथे वटपौर्णिमेच्या दिवशीच विधवा प्रथेविरुध्द क्रांतीकारक निर्णय
वाढणार्‍या वीजेच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणची वीज चोरीविरोधात कडक मोहीम
पारदर्शक निवडणुका होण्यासाठी दक्षता घ्या : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

तालुक्यातील मतदार, कार्यकर्ते, माता-भगिनींच्या भावना
इस्लामपूर / प्रतिनिधी : साहेब, तुम्ही मतदार संघाची अजिबात चिंता करू नका. आम्ही आपला हा गड लढविण्यास समर्थ आहोत. कोणीबी येवू द्या आणि कितीबी येवू द्या आमच्यावर फरक पडत नाही. तुम्ही निर्धास्तपणे राज्यात फिरा आणि गुजरात धार्जिण्य, जातीयवादी भाजपा युतीचे सरकार खाली खेचा, अशा भावना गावोगावचे मतदार व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. जयंत पाटील यांच्यासमोर व्यक्त केल्या. कार्यकर्ते व मतदारांनी आ. पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले, तर माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून त्यांना आशिर्वाद दिले.
आ. पाटील यांनी राज्याच्या राजकारणातून थोडीशी उसंत मिळताच आपल्या मतदारसंघा तील गोटखिंडी, बावची, पोखर्णी, नागाव, भडकंबे, तुजारपूर, गाताडवाडी, अहिरवाडी, पडवळवाडी, माळवाडी, सावळवाडी, नवेखेड, जुनेखेड, मसूचीवाडी, मिरजवाडी, दुधारी, भवानीनगर, किल्ले मच्छिंद्रगड, नरसिंहपूर, शिरटे आदी गावांना भेटी देऊन कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गावा-गावातील प्रचार कामाचा आढावाही घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील त्यांच्या समवेत होते.
आ. पाटील म्हणाले, माझा आपल्यावर पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे मला मतदार संघाची कोणतीही चिंता नाही. आपले घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे. आपले नवे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस हे आहे. हे चिन्ह घरा-घरापर्यंत पोचवा. आपण गेल्या 5 वर्षात व त्यापूर्वीही केलेली विकासकामे आपल्या समोर आहेत. आपण बुथवर लक्ष केंद्रीत करा. प्रत्येकाने घरे वाटून घेत प्रत्येक मतदारापर्यंत पोचा. आपण आपल्या पक्षाच्या वतीने राज्यात 87 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा केले आहेत. या सर्व मतदार संघात मला जावे लागणार आहे. वेळ कमी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकदिलाने प्रचाराची धुरा सांभाळा.
इस्लामपूर : संघातील भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा देताना माता-भगिनी.

COMMENTS