Homeताज्या बातम्यादेश

मिझोराममध्ये झेडपीएमचा एकहाती विजय

नवी दिल्ली ः मिझोराम राज्यातील 40 विधानसभेच्या जागांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून, यामध्ये काँगे्रस, भाजप या प्रस्थापित पक्षाला मात देत झोरम प

डॉ. शिवाजी काळेे यांचा सन्मान म्हणजे एका ज्ञानतपस्वी शिक्षकाचा गौरव  
मनपा लेखाधिकारी मानकरच्या घरातून लाखोंचे घबाड जप्त ; 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
जावलीचे जवान प्रथमेश पवार यांना विरमरण

नवी दिल्ली ः मिझोराम राज्यातील 40 विधानसभेच्या जागांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून, यामध्ये काँगे्रस, भाजप या प्रस्थापित पक्षाला मात देत झोरम पीपल्स मूव्हमेंटने अर्थात झेडपीएमने विजय मिळवला आहे. 40 पैकी 27 जागां मिळवत झेडपीएम सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रन्टला (एमएनएफ) केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर एका जागेवर आघाडी आहे. दुसरीकडे, भाजपालाही 2 जागांवर यश मिळाले आहे. तर काँग्रेसला केवळ एकच जागा मिळवता आली. राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर काँग्रेसला मिझोराममध्येही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विशेष म्हणजे मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट, मिझो नॅशनल फ्रन्ट आणि काँग्रेस पक्षात त्रिशंकू लढत होण्याची अपेक्षा होती. पण या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपशेल अपयश आले आहे. 2018 मधील खराब कामगिरीनंतर काँग्रेस पुनरागमन करण्याची आशा होती. मिझोराममध्ये तुलनेने कमी राजकीय ताकद असलेल्या भाजपाने दोन जागा जिंकल्या आहेत. झेडपीएमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार लालदुहोमा यांनी सेरछिप मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. तर दक्षिण तुइपुई मतदारसंघात राज्याचे विद्यमान आरोग्य मंत्री आणि एमएनएफचे उमेदवार आर लालथांगलियाना यांचा झेडपीएमच्या जेजे लालपेख्लुआ पराभव केला आहे. झेडपीएमचे लालनघिंग्लोवा ह्मर हे ऐझॉल पश्‍चिम-2 मतदारसंघात विजयी झाले. याशिवाय तुईचांगमध्ये झेडपीएमचे उमेदवार डब्लू. छुआनवमा यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री तवन्लुइया यांचा पराभव केला. 1987 मध्ये मिझोरामला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यात काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रन्टने राजकीय वर्चस्व गाजवले आहे. 1998 च्या विधानसभा निवडणुकीत एमएनएफने काँग्रेसचा पराभव केला. मिझोराममधील 10 वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवून लावत झोरमथांगा हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. सलग दहा वर्षे सत्ता राखल्यानंतर 2008 आणि 2013 च्या निवडणुकीत काँग्रेसने एनएफएफचा पराभव केला. त्यानंतर 2018 मध्ये मिझो नॅशनल फ्रन्टने पुन्हा काँग्रेसचा पराभव करत सत्ता मिळवली. मात्र यावेळेस झेडपीएमने सर्वच पक्षांना मात देत एकहाती सत्ता मिळवली आहे.

COMMENTS