Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मायणीचे वनपाल रामदास घावटे यांना रजत पदक

वडूज / प्रतिनिधी : जागतिक वन दिनाच्या निमित्ताने राज्यातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या वन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. य

चांदोलीचे पर्यटन आजपासून तीन दिवस बंद
कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत – रविकांत तुपकर
सोनहिरा कारखान्याची सहाव्यांदा निवडणूक बिनविरोध

वडूज / प्रतिनिधी : जागतिक वन दिनाच्या निमित्ताने राज्यातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या वन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वडूज वन परिक्षेत्रातील मायणी येथील वनपाल रामदास घावटे यांना रजत पदक व सन्मान पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
दि. 21 मार्च 2025 जागतिक वन दिन या दिवशी वन सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीने नवी मुंबई येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सन्मान सोहळ्याला वनमंत्री गणेश नाईक, महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वन विभागाच्या श्रीमती शोम्मिता विश्‍वास, एम श्रीनिवास रेड्डी तसेच सर्व महाराष्ट्रातील वरिष्ठ वन अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवी मुंबई येथे कार्यक्रमात रामदास घावटे यांना सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल मुख्य वनसंरक्षक एम. आर. रामानुजन, सातार्‍याचे उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी सागर गवते, श्री हरिश्‍चंद्र वाघमोडे तसेच सहायक वनसंरक्षक दिगंबर जाधव, महेश झांजुर्णे, नितीन आटपाडकर वनपरिक्षेत्र अधिकारी वडूज, सातारा वन विभागाचे सर्व वनपाल, वनरक्षक सहकारी मित्र व कुटुंबीय, ग्रामस्थ यांच्यावतीने रामदास घावटे यांचे अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS