जळगाव प्रतिनिधी - चोपडा शहरातील मेन रोडवर असलेले लक्ष्मी ज्वेलर्स दुकान रात्री सव्वातीन वाजेच्या सुमारास चार चाकी वाहनावर आलेले चोरटे यांनी लक्ष

जळगाव प्रतिनिधी – चोपडा शहरातील मेन रोडवर असलेले लक्ष्मी ज्वेलर्स दुकान रात्री सव्वातीन वाजेच्या सुमारास चार चाकी वाहनावर आलेले चोरटे यांनी लक्ष्मी ज्वेलर्स शटर कटरच्या साह्याने तोडून आत प्रवेश करून चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेमध्ये अडीच ते तीन लाखाचे चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने चोपडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण के.के पाटील व अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद असल्याने त्याच्या आधारे पोलीस अधिकारी तपास लावत आहेत.
COMMENTS