Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत  

खरगेंच्या डिनर पार्टीवर ठाकरे गटाच्या खासदारांचा बहिष्कार

मुंबई/प्रतिनिधी ः राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांधी कधी माफी मागत नसल्याचे वक्तव्य करून सावरकरांवर

आर्थिक उद्दिष्ट साध्यतेसाठी नियोजन आवश्यकच – स्वप्नील करवंदे
शिवशाही बसमध्ये चालकाची आत्महत्या
ललित पाटील प्रकरणात पोलिसांनी घेतले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

मुंबई/प्रतिनिधी ः राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांधी कधी माफी मागत नसल्याचे वक्तव्य करून सावरकरांवर टीका केली होती. तर दुसरीकडे मालेगावच्या सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना खडेबोल सुनावत सावरकर आमचे दैवत असल्याचे म्हटले होते. त्याचे पडसाद सोमवारी राज्यभर उमटले.
याच पार्श्‍वभूमीवर आता ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांची काल मालेगाव येथे सभा झाली. यावेळी त्यांनी सावरकरांच्या केलेल्या अपमानावरुन राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले. मी राहुल गांधींना सांगतो की, ही लोकशाहीची लढाई आहे. सावरकरांचा अपमान आम्हाला पटणारा नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भरसभेत राहुल गांधींचा समाचार घेतला.यावरुन राज्यात काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झालेले पाहायला मिळाले.  सावरकरांच्या मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत हे सर्वश्रुत आहेत. काँग्रेस पक्षाने विचारांशी कधीच तडजोड केलेली नाही. काँग्रेस सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारा पक्ष असून कुठल्याची धर्माचा वा व्यक्तीचा द्वेष करत नाही. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन काँग्रेस जात असतो, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. तसेच सावरकरांच्या मुद्यावरून राहुल गांधी व उद्धव ठाकरे लवकरच चर्चा करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी एकत्र ः नाना पटोले – देशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून एका मोठ्या लढाईसाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. सध्या देश, लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई महत्वाची आहे. ही लढाई मोठी असून भाजपाविरोधातील लढाईसाठी आम्ही एकत्र लढत असल्याची भूमिका काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केली. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे, त्यात नवीन काहीच नाही, असेही त्यांनी नमूद केले. सावरकर मुदद्यावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत. परंतु त्यात त्यांना यश येणार नाही, आम्ही एकत्रच राहणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला.

COMMENTS