Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस ठाण्यात हाणामारी करणार्‍यांवर कारवाईची चिन्हे

भिंगारमधील घटनेचा अहवाल वरिष्ठांना पाठवला

अहमदनगर प्रतिनिधी - भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांमध्ये मागील बुधवारी रात्री झालेल्या मारहाणीप्रकरणी चौकशी करून अहवाल वरिष्ठा

राहाता नगरपरिषद मुंबई दुर्घटनेतून धडा घेणार का ?
रक्षाबंधनाकरिता डाकविभागाद्वारे विशेष राखी कव्हर
अमृतवाहिनीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांचे 100 टक्के प्लेसमेंट

अहमदनगर प्रतिनिधी – भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांमध्ये मागील बुधवारी रात्री झालेल्या मारहाणीप्रकरणी चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली. यामुळे ‘त्या’ दोन अंमलदारांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
भिंगारमधील दोन पोलिस अंमलदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. त्यांच्यात बुधवारी रात्री ठाणे अंमलदार कक्षात चांगलाच राडा झाला. ही घटना पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. यामुळे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली गेली. हप्तेखोरीतून हा प्रकार झाल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.


प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले व स्टेशन डायरीला घटनेची नोंद करून चौकशी सुरू केली होती. आता या प्रकरणी चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असल्याचे त्यांनी सांगितले. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, समाज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे, त्यांच्यातच हप्तेखोरीसाठी पोलिस ठाण्यातच वाद होत असतील व यातून परस्परांना मारहाणीच्या घटना घडत असतील तर यामुळे जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे ही घटना वरिष्ठांनी गांभीर्याने घेतली पाहिजे व या दोन्ही अंमलदारांवर कारवाई केली पाहिजे. पण कारवाई झाली नाही तर यातून समाजात वेगळा संदेश जाईल, यात शंका नाही, असेही बोलले जात आहे. या हाणामारीच्या प्रकाराची व त्याची वरिष्ठांकडून सुरू असलेल्या चौकशीची जोरदार चर्चा पोलिस दलात आहे. त्यामुळे हाणामारी करणार्‍यांबाबत वरिष्ठ काय भूमिका घेतात, याची उत्सुकता पोलिसांना आहे.

COMMENTS