महाबळेश्वर / प्रतिनिधी : महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात आज पांढर्या रंगाच्या दुर्मिळ शेकरुने दर्शन दिले. दुर्मिळ अशा पांढर्या शे
महाबळेश्वर / प्रतिनिधी : महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात आज पांढर्या रंगाच्या दुर्मिळ शेकरुने दर्शन दिले. दुर्मिळ अशा पांढर्या शेकरुला पाहण्यासाठी आणि त्याला कॅमेर्यात क्लिक करण्यासाठी लोक प्रयत्न करत होते.
शेकरु महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाबळेश्वर येथील जंगल परिसरात अनेक वन्यजीवांचे अस्तित्व आहे. या वन्यजीवांमध्ये प्रमुख आकर्षण शेकरुचे आहे. खारीपेक्षा आकाराने मोठी असणारी खार म्हणजे शेकरू. परिसरामध्ये शेकरू मोठ्या प्रमाणावर आढळतात. बर्याचदा येथे फिरताना सहज झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारताना त्याचे दर्शन होते. झाडावरील फळे हा त्याचा मुख्य आहार तर झाडाच्या सुरक्षित उंचीवर सुक्या काटक्यांच्या सहाय्याने तो आपले घर बांधतो.
अनेकदा वन्य प्राण्यांमध्ये मेलानिनच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग अर्धवट पांढरा किंवा पूर्ण पांढरा होत असतो. सहसा दुर्मिळ अशा पांढर्या शेकरूचे दर्शन क्वचितच होते. महाबळेश्वर येथील तहसील भागात झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारताना आज पुन्हा एकदा पांढर्या शेकरूचे दर्शन झाले आहे. यापूर्वीही महाबळेश्वरच्या जंगल परिसरात त्याचे दर्शन झाले आहे.
COMMENTS