Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिद्धेश कदम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवे अध्यक्ष

रामदास कदम यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

मुंबई ः भाजपवर नाराज असलेले व माध्यमांसमोर तोंडसुख घेणारे माजी मंत्री रामदास कदम यांची नाराजी दूर करत त्यांचा धाकटा मुलगा सिद्धेश कदम याची महाराष

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाचे दर गगनाला भिडलेत
महापौर किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी
जम्मू-काश्मीरमध्ये 5 जवानांना वीरमरण

मुंबई ः भाजपवर नाराज असलेले व माध्यमांसमोर तोंडसुख घेणारे माजी मंत्री रामदास कदम यांची नाराजी दूर करत त्यांचा धाकटा मुलगा सिद्धेश कदम याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पर्यावरण खात्याने या संदर्भातील परिपत्रक शुक्रवारी जारी केले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी सध्या निवृत्त सनदी अधिकारी आबासाहेब जर्‍हाड यांच्याकडें होती. मात्र, ते प्रदीर्घ काळ गैरहजर असल्याचे कारण देत सरकारने त्यांना पदावरून दूर केले आहे. त्यांच्या जागी सिद्धेश कदम यांची वर्णी लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी रामदास कदम हे एक आहेत. कदम यांचे ज्येष्ठ चिरंजीव योगेश कदम हे दापोलीचे आमदार आहेत. तर, कदम यांची शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रामदास कदम हे आक्रमक स्वभावाचे नेते आहेत. मनातल्या गोष्टी ते बिनधास्त बोलून टाकतात. उत्तर पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून सिद्धेश कदम यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र, त्या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचेच गजानन किर्तीकर हे खासदार आहेत. मात्र कदम यांनी सिद्धेश यांच्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने किर्तीकर आणि कदम यांच्यात कलगीतुरा रंगला होता. एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून त्यावर तोडगा काढला होता. मात्र, किर्तीकर यांना डावलून अन्य कोणाला उमेदवारी देणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानेच शिंदे यांनी सिद्धेश कदम यांना मंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. पर्यावरण खाते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. रामदास कदम हे काही दिवसांपासून भाजपवरही नाराज आहेत. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे आपल्या मुलाच्या मतदारसंघात हस्तक्षेप करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. आमदाराला विश्‍वासात न घेता रवींद्र चव्हाण हे दापोलीमध्ये कामे करत आहेत. त्याबद्दल नुकतीच कदम यांनी माध्यमात जाहीर नाराजी व्यक्त केली. आम्ही मोदी आणि शाह यांच्यावर विश्‍वास ठेवून भाजपसोबत आलो आहोत. आमच्याशी विश्‍वासघात होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांची कानउघडणी करायला हवी. अन्यथा, भाजपविषयी चुकीचा संदेश जाईल असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

COMMENTS