Homeमहाराष्ट्रअहमदनगर

पोटे यांना स्वीकृत नगरसेवक पदापासूनही रोखणार?

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगर परिषदेची झालेल्या निवडणुकीत मनोहर पोटे यांना रोखण्यात भाजपला यश आले असले तरी मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास निम्मे नगरसेवक निवडणून आल्याने त्यांची स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागणार असल्याचे शिवसेनेकडून  स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, त्यांना सभागृहात एन्ट्री मिळू नये यासाठी त्यांना रोखण्यासाठी विरोधकांची यंत्रांना कामाला लागल्याची चर्चा श्रीगोंदा शहरात सुरु आहे. श्रीगोंदा पालिकेत भाजपचे १३ तर शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपने नगरसेवकांची गटनोंदणी केली असून शिवसेनेची गटनोंदणीसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. दोन दिवसात शिवसेनेची गटनोंदणी होण्याची शक्यता आहे. विषय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवड यासाठी गटनेता निवड आवश्यक आहे. शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी विरोधकांची यंत्रांना कामाला लागली असली तरी आम्ही एकसंघ असून एकसंघच राहू असे शिवसेनेच्या नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी एकत्र येण्याची गरज : भोस 
ढवळगावमध्ये ग्रामस्वच्छता करत भक्तीचा जागर
श्रीगोंदा शहरातील रस्त्याचे काम पूर्ण करा – संभाजी ब्रिगेडची मागणी

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगर परिषदेची झालेल्या निवडणुकीत मनोहर पोटे यांना रोखण्यात भाजपला यश आले असले तरी मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास निम्मे नगरसेवक निवडणून आल्याने त्यांची स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागणार असल्याचे शिवसेनेकडून  स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, त्यांना सभागृहात एन्ट्री मिळू नये यासाठी त्यांना रोखण्यासाठी विरोधकांची यंत्रांना कामाला लागल्याची चर्चा श्रीगोंदा शहरात सुरु आहे.

श्रीगोंदा पालिकेत भाजपचे १३ तर शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपने नगरसेवकांची गटनोंदणी केली असून शिवसेनेची गटनोंदणीसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. दोन दिवसात शिवसेनेची गटनोंदणी होण्याची शक्यता आहे. विषय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवड यासाठी गटनेता निवड आवश्यक आहे.

शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी विरोधकांची यंत्रांना कामाला लागली असली तरी आम्ही एकसंघ असून एकसंघच राहू असे शिवसेनेच्या नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

COMMENTS