Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ

जुन्या कचऱ्यात नवा कचरा, आंदोलनाचा इशारा श्रीगोंदा :  श्रीगोंदा नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा गेल्या दोन वर्षांत पूर्णपणे बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप करत याबाबत संभाजी ब्रिगेडकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जुन्या कचऱ्याची विल्हेवाट न लावता त्यावरच नवीन कचरा टाकला जात असल्याने शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी केला आहे. नगरपरिषदेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक असल्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या काळात तत्कालीन प्रशासकीय अधिकारी भगत मॅडम यांच्या कार्यकाळात घनकचरा व्यवस्थापनासाठी अनेक टेंडर देण्यात आले. त्यामध्ये निंबाळकर नावाच्या ठेकेदाराला सुमारे ९५ लाख रुपयांचे बायोमायनिंगचे टेंडर देण्यात आले होते; मात्र हे काम आजही अर्धवट अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. तसेच पुण्यातील शिंदे नावाच्या ठेकेदाराला दरमहा सुमारे २२ लाख रुपयांचे टेंडर देण्यात आले होते. मात्र त्यांच्या कार्यकाळातही कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेचा घनकचरा डेपो अत्यंत कमी जागेत असून तेथे तातडीने कचऱ्याचे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. परंतु अत्यल्प कामगारांमुळे दररोज जमा होणाऱ्या सुमारे १० टन कचऱ्याचे वर्गीकरणच होत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. याशिवाय कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री वापराअभावी धुळखात पडली असून पालिकेच्या आरोग्य विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कचरा डेपो परिसरातील शिंदे वस्ती, रायकर वस्ती आणि वडवकर वस्ती या भागातील नागरिकांना दुर्गंधी, डास, माशा आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरात जंतुनाशक फवारणी होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि गटनेत्यांनी तातडीने घनकचरा व्यवस्थापन सुरळीत करावे, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी दिला आहे.

सरकारी कामात अडथळा…दोघांना कारावास
जामखेडमध्ये कलाकेंद्रातील वेश्याव्यवसाय बंद करा : गणेश भानुसे
धक्कादायक… नगर येथील सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर पोलिसाकडून अत्याचार

जुन्या कचऱ्यात नवा कचरा, आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा :  श्रीगोंदा नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा गेल्या दोन वर्षांत पूर्णपणे बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप करत याबाबत संभाजी ब्रिगेडकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जुन्या कचऱ्याची विल्हेवाट न लावता त्यावरच नवीन कचरा टाकला जात असल्याने शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी केला आहे.

नगरपरिषदेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक असल्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या काळात तत्कालीन प्रशासकीय अधिकारी भगत मॅडम यांच्या कार्यकाळात घनकचरा व्यवस्थापनासाठी अनेक टेंडर देण्यात आले. त्यामध्ये निंबाळकर नावाच्या ठेकेदाराला सुमारे ९५ लाख रुपयांचे बायोमायनिंगचे टेंडर देण्यात आले होते; मात्र हे काम आजही अर्धवट अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले.

तसेच पुण्यातील शिंदे नावाच्या ठेकेदाराला दरमहा सुमारे २२ लाख रुपयांचे टेंडर देण्यात आले होते. मात्र त्यांच्या कार्यकाळातही कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेचा घनकचरा डेपो अत्यंत कमी जागेत असून तेथे तातडीने कचऱ्याचे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. परंतु अत्यल्प कामगारांमुळे दररोज जमा होणाऱ्या सुमारे १० टन कचऱ्याचे वर्गीकरणच होत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

याशिवाय कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री वापराअभावी धुळखात पडली असून पालिकेच्या आरोग्य विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कचरा डेपो परिसरातील शिंदे वस्ती, रायकर वस्ती आणि वडवकर वस्ती या भागातील नागरिकांना दुर्गंधी, डास, माशा आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरात जंतुनाशक फवारणी होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि गटनेत्यांनी तातडीने घनकचरा व्यवस्थापन सुरळीत करावे, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी दिला आहे.

COMMENTS