Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीकृष्णचरित्र म्हणजे सर्वधर्माचे सारतत्व ः हभप सखाराम महाराज

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः श्रीकृष्णचरित्र म्हणजे सर्वधर्माचे  सारतत्व असून महानुभाव पंथ हा पंचकृष्ण मानतात,त्यांचे भक्तितत्व द्वैत स्वरूपाचे आहे, त्

अखेर महिला अत्याचारप्रकरणी गोविंद मोकाटेला झाली अटक
महिलांना शिक्षण देण्याचा महात्मा फुलेंचा निर्णय क्रांतीकारी होता
पंतप्रधान मोदींनी केली पिचड यांची आस्थेने चौकशी

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः श्रीकृष्णचरित्र म्हणजे सर्वधर्माचे  सारतत्व असून महानुभाव पंथ हा पंचकृष्ण मानतात,त्यांचे भक्तितत्व द्वैत स्वरूपाचे आहे, त्यातच जीवनाचे कल्याण आहे, असे विचार ह.भ.प. प्रा.सखाराम महाराज कर्डिले यांनी व्यक्त केले.
   श्रीरामपूर नेवासा रोडवरील महानुभाव श्रीकृष्ण मंदिरात भजन गायन, पूजाविधी, दहीहंडी, पुस्तक भेट, श्रीकृष्णचरित्र पारायण इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी श्रीकृष्णजीवन म्हणजे माणुसकीचे, लोकशाहीचे अमृतफळ असल्याचे सांगून ह.भ. प.प्रा.कर्डिले महाराज यांचा परिचय करून दिला.महानुभाव गोविंदबाबा व महानुभाव विशालबाबा यांनी प्रा.कर्डिलें महाराज आणि आलेला सर्वांचा सन्मान केला.यावेळी लेविन भोसले, भगीरथराव जाधव, शिवाजीराव गायके आदिंनी मंदिरप्रमुख महंत ब्रिजलालदादा पंजाबी यांच्या योगदानाचे कौतुक केले.ह.भ.प.प्रा.सखाराम महाराज  कर्डिले यांनी श्रीकृष्णजन्म अष्टमीचे महत्व विशद केले. श्रीकृष्ण म्हणजे सर्वात होते, सर्वांचे होते.  त्यांनी समतेचे आणि न्यायाचे राज्य केले. महंत ब्रिजलालदादा ह आजारी असले तरीही ते श्रीकृष्णभक्तीत लीन असल्याचे सांगून महानुभाव आश्रमातील सर्वांच्या आदर्श सेवाभावाचे कौतुक केले. माजी प्राचार्य टी. ई. शेळके, प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी श्रीकृष्णमंदिर आणि ब्रिजलालदादा पंजाबी यांचे दर्शन घेतले, सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सोनाली पंजाबी, शकुताई पंजाबी,मनोरमाताई पंजाबी, चंद्रकलाताई पंजाबी, शैलाताई पंजाबी, स्वातीताई पंजाबी, विद्याताई पंजाबी, कु. मनस्वी गोविंदराज पंजाबी यांनी दोन दिवसाचे श्रीकृष्ण जन्म सोहळ्याचे नियोजन केले. अनेक भक्तिपरिवार उपस्थित होते.लेविन भोसले यांनी ग्रंथभेट देत सर्वांचे आभार मानले.

COMMENTS