Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ललित कला स्पर्धेत श्रेयश त्रिभुवनचे यश

राहाता : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “जिल्हास्तरीय भव्य ललित कला स्पर्धा २०२५” (११ वे वर्ष) चा पारितोषिक वितरण समारंभ गंगुबाई विखे इनडोअर स्टेडियम, लोणी येथे उत्साहात पार पडला. या वेळी शालिनी विखे व डॉ. सुस्मिता विखे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अस्तगाव येथील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी श्रेयश जॉन त्रिभुवन याने चित्रकला गट ‘अ’ (इयत्ता पहिली ते चौथी) मध्ये राहाता तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. भाजप राहाता तालुका अनुसूचित जाती मंडल अध्यक्ष जॉन युवराज त्रिभुवन यांचे ते चिरंजीव आहेत. श्रेयशच्या यशाबद्दल अस्तगाव ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, अस्तगाव येथील शिक्षकवृंदांच्या वतीने त्याचे अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहे. या यशामुळे शाळेचे व गावाचे नाव तालुकास्तरावर उज्ज्वल झाले आहे. या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सहाणे यांच्यासह शेळके, भुतकर, कर्डिले, सगभोर, जाधव, गीते, नळे, गमे, दातीर, गोर्डे, ढूस, भांड, कहाणे, पंडित, मोरे, निळे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.   कर्मवीर काळे विद्यालयाचा रेखाकला परीक्षेत १०० टक्के निकाल   कोपरगाव शहर : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात येणारी शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात करंजी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयाचा या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेत एलिमेंट्री या परीक्षेत अकरा विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात अ श्रेणीत १, ब श्रेणीत ६ तर सी श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच इंटरमिजिएट या परीक्षेत एकूण २८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यांचाही निकाल शंभर टक्के लागला आहे. यात अ श्रेणीत ५ ,ब श्रेणीत ११ , सी श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या मिळालेल्या श्रेणीचा उपयोग या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या परीक्षेमध्ये वाढीव गुण मिळण्यास  होतो. ज्या विद्यार्थ्यास अ श्रेणी आहे त्यास ७ गुण, ब श्रेणी असलेल्या विद्यार्थ्यास ५ गुण,व क श्रेणी असलेल्या विद्यार्थ्यास ३ गुण जास्तीचे मिळतात. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक  माळी डी एम तसेच स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष कारभारी आगवण, सांडूभाई पठाण, डॉ. सुनील देसाई यांच्यासह पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी नागरिक यांनी कौतुक केले आहे.

स्व.अजित पवारांना प्रभावती घोगरेंकडून अभिवादन
राहाता येथे स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊंना अभिवादन  
शिक्षक राष्ट्रप्रेमाची पिढी घडवतात : डॉ. स्वाधीन गाडेकर

राहाता : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “जिल्हास्तरीय भव्य ललित कला स्पर्धा २०२५” (११ वे वर्ष) चा पारितोषिक वितरण समारंभ गंगुबाई विखे इनडोअर स्टेडियम, लोणी येथे उत्साहात पार पडला. या वेळी शालिनी विखे व डॉ. सुस्मिता विखे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अस्तगाव येथील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी श्रेयश जॉन त्रिभुवन याने चित्रकला गट ‘अ’ (इयत्ता पहिली ते चौथी) मध्ये राहाता तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.

भाजप राहाता तालुका अनुसूचित जाती मंडल अध्यक्ष जॉन युवराज त्रिभुवन यांचे ते चिरंजीव आहेत. श्रेयशच्या यशाबद्दल अस्तगाव ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, अस्तगाव येथील शिक्षकवृंदांच्या वतीने त्याचे अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहे. या यशामुळे शाळेचे व गावाचे नाव तालुकास्तरावर उज्ज्वल झाले आहे. या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सहाणे यांच्यासह शेळके, भुतकर, कर्डिले, सगभोर, जाधव, गीते, नळे, गमे, दातीर, गोर्डे, ढूस, भांड, कहाणे, पंडित, मोरे, निळे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

 

कर्मवीर काळे विद्यालयाचा रेखाकला परीक्षेत १०० टक्के निकाल

  कोपरगाव शहर : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात येणारी शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात करंजी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयाचा या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

या परीक्षेत एलिमेंट्री या परीक्षेत अकरा विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात अ श्रेणीत १, ब श्रेणीत ६ तर सी श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच इंटरमिजिएट या परीक्षेत एकूण २८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यांचाही निकाल शंभर टक्के लागला आहे. यात अ श्रेणीत ५ ,ब श्रेणीत ११ , सी श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या मिळालेल्या श्रेणीचा उपयोग या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या परीक्षेमध्ये वाढीव गुण मिळण्यास  होतो. ज्या विद्यार्थ्यास अ श्रेणी आहे त्यास ७ गुण, ब श्रेणी असलेल्या विद्यार्थ्यास ५ गुण,व क श्रेणी असलेल्या विद्यार्थ्यास ३ गुण जास्तीचे मिळतात. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक  माळी डी एम तसेच स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष कारभारी आगवण, सांडूभाई पठाण, डॉ. सुनील देसाई यांच्यासह पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी नागरिक यांनी कौतुक केले आहे.

COMMENTS