नाशिक प्रतिनिधी - स्वच्छता हे एक 'अखंड' अभियान मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था तिच्या स्थापनेपासून सातत्याने राबवित आहे आणि विद्यार्थ्यांमध
नाशिक प्रतिनिधी – स्वच्छता हे एक ‘अखंड’ अभियान मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था तिच्या स्थापनेपासून सातत्याने राबवित आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये हे मूल्य रूजवत आहे. आज हे मूल्य देशव्यापी चळवळीत बदलले आहे. त्याचेच द्योतक म्हणजे मा. पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेले ‘स्वच्छ भारत अभियान – एक तारीख एक तास श्रमदान.’
देशात १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत ०१ ऑक्टोबरला या केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालय नाशिकच्या वतीने पिंपळद ता. जि. नाशिक येथे मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था तसेच ग्रामपंचायत पिंपळद च्या सहयोगाने ‘एक तारीख एक तास’* श्रमदानाचे आयोजन सकाळी दहा वाजता करण्यात आले. यात वालदेवी धरण परिसर, स्मशानभूमी परिसर, शाळा परिसर, गाव मंदिर परिसर, अजानवृक्ष आश्रम परिसर येथे स्वच्छता करण्यात आली.
या कार्यक्रमाला माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालय नाशिकचे प्रमुख अधिकारी श्री एस बी मालखेडकर,मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचा संस्थापक श्री प्रकाश सुकदेव कोल्हे,ग्राम विस्तार अधिकारी मा.श्री. विनोद पंडित साबळे, सरपंच मा.सौ. अलकाताई भाऊसाहेब झोंबाड, उपसरपंच मा.श्री. संजय भावका अनार्थे, पोलीस पाटील मा.श्री. सोमनाथ कारभारी बेझेकर, ह.भ.प. शिवराम महाराज म्हसकर, तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत मा.श्री. रामचंद्र खांडबहाले आदी मान्यवर उपस्थित होते. स्वतः मान्यवरांनी ही स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ केला. मानवधन संस्था संचलित शाळेतील शिक्षक व धनलक्ष्मी शाळेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.
देशभरात एकाचवेळी आयोजित करण्यात आलेला हा मोठा उपक्रम असून प्रत्येक शहर गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. अभिमानाची बाब म्हणजे मानवधन संस्था सातत्याने ३६५ दिवस स्वच्छता अभियान राबवत आहे. २००७ साली संस्था संचलित धनलक्ष्मी शाळेने ‘जिल्हा स्तरीय स्वच्छता पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे एक तारीख एक तास याच बरोबर ‘हर रोज, स्वच्छता की खोज!’ हाच संदेश मानवधन संस्था सातत्याने देण्याचे कार्य करत आहे. ज्ञानरत्न डॉ. श्री. प्रकाश सुकदेव कोल्हे संस्थापक मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक
COMMENTS